शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझ्यावर भरपूर अन्याय झाला…”, सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या, “पुरस्कार न मिळणं…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 29, 2024 | 7:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Usha Naik Statement

"माझ्यावर भरपूर अन्याय झाला…", सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या, "पुरस्कार न मिळणं…"

मराठी कलाविश्वाला अनेक गाजलेले चित्रपट देणाऱ्या अभिनेत्री उषा नाईक हे नाव कोणत्याही मराठी रसिकाला नवीन नाही. मराठी सिनेसृष्टीत गेली अनेक वर्षे उषा नाईक काम करत आहे. आजवर त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका केल्या. नृत्यांगणापासून सुरु झालेला त्यांचा प्रवास मुख्य अभिनेत्री, चरित्र अभिनेत्रीपर्यंत पोहोचला. चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्यानंतर उषा नाईक यांनी मालिकाविश्वाकडे आपली पावले वळविली. (Usha Naik Statement)

नुकतीचं उषा नाईक यांनी इट्स मज्जा या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या चित्रपटातील प्रवासाबद्दल बरंच भाषण केलं. दरम्यान त्यांनी दिल्या जाणाऱ्या पुरस्काराबद्दलही भाष्य केलं. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, “मला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला, पण तो अवॉर्ड घ्यायला मी गेले नाही. माझ्या मुलाचे उपचार सुरु होते त्यामुळे डॉक्टरकडे धावा सुरुचं होत्या. आणि त्यामुळे हे सर्व सोडून तिथे जाऊन अवॉर्ड घेणं मला योग्य नाही वाटलं.

आणखी वाचा – दीपिका पदुकोणला मुलगा होणार की मुलगी?, रणवीर सिंहने केलेलं भाष्य चर्चेत, म्हणालेला, “माझं कुटुंब…”

पुढे त्या म्हणाल्या, “त्यावेळी फिल्मफेअर अवॉर्डमध्ये मराठी कलाकारांना घेणं बंद केलं. आम्ही अवॉर्ड देतो पण ही मराठी कलाकार मंडळी अवॉर्ड घ्यायला येत नाहीत. यांना या अवॉर्डची काळजी नसेल तर जाऊदे, असं तेव्हा बोललं जायचं. तेव्हापासून हा अवॉर्ड देणं त्यांनी बंद केलं आणि त्यानंतर पुन्हा हा फिल्मफेअर अवॉर्ड देण्यास रितेश देशमुख सरांनी स्वतंत्रपणे सुरु केलं. तेव्हा मी या पुरस्कार सोहळ्याला गेले होते त्यावेळी तिथेही मी बोलून दाखवलं की, हे फिल्मफेअर अवॉर्ड माझ्यामुळे बंद झालं होतं, ते पुन्हा एकदा रितेश देशमुख सरांनी सुरु केलं”.

आणखी वाचा – लग्नानंतर बायकोसह पुण्यातील ‘या’ ठिकाणी फिरायला गेला प्रथमेश परब, फोटोही केला शेअर, म्हणाला, “थोडासा वेळ काढून…”

पुढे त्या म्हणाल्या, “सिनेसृष्टीत काम करत असताना माझ्यावर भरपूर अन्याय झाले होते. पण ते सर्व माझ्यावरचे अन्याय या ‘एक हजारच्या नोट’ने भरून काढले. जवळजवळ पंधरा ते सोळा अवॉर्ड मला मिळाले. काम करणं हे मला चांगलं माहित होतं. आता अवॉर्ड मिळणं न मिळणं हा काही नशिबाचा भाग नाही तर काही लोकांच्या मर्जीचा भाग आहे. हे मला नंतर नंतर कळत गेलं”.

Tags: entertainmentmarathi actressUsha Naik movieusha naik songsUsha Naik Statement
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Visakha Subhedar appreciated that a working woman bought a new house

घरात काम करणाऱ्या महिलेला विशाखा सुभेदारने घेऊन दिलेलं भाड्याने घर, आता त्याच व्यक्तीने खरेदी केला स्वत:चा २ बीएचके फ्लॅट, अभिनेत्री म्हणाली, "कष्ट करून..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.