‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्रेक्षकांची लाडकी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजेच तितीक्षा तावडे. तितीक्षाने या मालिकेतून नेत्रा या भूमिकेतून प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. नेत्रा व अद्वैतची जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली. अशातच काही दिवसांपूर्वी या मालिकेतील अद्वैतचा म्हणजेच अजिंक्य ननावरेचा विवाहसोहळा संपन्न झाला. अजिंक्यने शिवानी सुर्वेसह लग्नगाठ बांधली आहे. त्या पाठोपाठ आता तितीक्षादेखील लग्नबंधनात अडकली. (Titeeksha Tawde Siddharth Bodke Wedding Updates)
अभिनेता सिद्धार्थ बोडके व तितीक्षा तावडेचा शाही विवाहसोहळा नुकताच संपन्न झाला आहे. तितीक्षा व सिद्धार्थच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो सोशल मीडियावरुन तुफान व्हायरल झाले आहेत. अगदी शाही थाटामाटात अखेर तितीक्षा व सिद्धार्थ लग्नबंधनात अडकले आहेत. दोघांच्या लग्नसोहळ्यातील लूकही विशेष चर्चेत आलेला पाहायला मिळत आहे. पारंपरिक लूकमध्ये सिद्धार्थ व तितीक्षा अगदी सुंदर दिसत होते. तितीक्षाने ऑफ व्हाईट रंगाची नऊवारी साडी नेसली होती तर या साडीला साजेसा असा पिवळ्या रंगाचा डिझाइनर ब्लाऊजही परिधान केला आहे. तर सिद्धार्थने तितीक्षाच्या लूकला साजेसा असा ऑफ व्हाईट रंगाची शेरवानी व त्यावर धोतर परिधान केला होता. त्यांचा हा खास लूक चाहत्यांच्या विशेष पसंतीस पडत आहे.
आणखी वाचा – Video : हळद लागताच रडू लागली पूजा सावंत, मंडपातील ‘तो’ भावुक व्हिडीओ व्हायरल

लग्नाच्या लूकनंतर आता दोघांचा लग्नानंतरचा लूकही समोर आला आहे. यामध्ये दोघेही अत्यंत वेगळ्या लूकमध्ये दिसले. तितीक्षाने यावेळी साधी अशी डिझायनर साडी नेसली होती आणि त्यावर डिझायर ब्लाउज परिधान केला होता. दागिन्यांमध्ये तिने एक छोटासा नेकलेस घालून मंगळसूत्र घातलं आहे. लग्नानंतरचा मिसेस बोडके म्हणून तिचा हा लूक फारच खास दिसत आहे. तर सिद्धार्थने यावेळी कलरफुल असा सदरा परिधान केलेला पाहायला मिळला. लग्नानंतरचा या नववधुवराचा साधा सिंपल लूक साऱ्यांच्या पसंतीस पडलेला पाहायला मिळत आहे.
कोणतीही भरजरी साडी वा लग्नासाठी लाल लेहेंगा परिधान न करता तितीक्षाने साध्या डिझायनर साडीची केलेली निवड प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. या लूकमध्ये तिचं सौंदर्य अधिक खुलूनही आलेलं पाहायला मिळालं. या नववधूवराचा हा लूक खरंच इतर वधू-वरांपेक्षा काहीसा वेगळा असल्याच पाहायला मिळत आहे.