सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अशातच एका मराठमोळ्या लाडक्या अभिनेत्रीच्या लग्नाची सर्वदूर चर्चा पसरलेली पाहायला मिळत आहे. ही प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री म्हणजेच पूजा सावंत. या अभिनेत्रीने आजवर तिच्या अभिनयाने व सौंदर्याने साऱ्या प्रेक्षक वर्गाला भुरळ घातली. आता प्रेक्षकांची लाडकी पूजा सावंत लवकरच विवाहबंधनात अडकण्यास सज्ज सज्ज झाली आहे. पूजाच्या लग्नापूर्वीच्या विधींचे अनेक फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहेत. (Pooja Sawant Siddhesh Chavan)
अशातच नुकताच पूजाच्या हळदी समारंभाचा कार्यक्रम पार पडला. पूजाचं अरेंज मॅरेज असून पूजा सिद्धेश चव्हाणसह लग्नबंधनात अडकणार आहे. पूजाला सिद्धेशच्या नावाची हळद लागलेली पाहायला मिळत आहे. तिच्या हळदी समारंभातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. मस्ती, डान्स करत पूजाच्या हळदीत सर्वांनी धमाल केलेली पाहायला मिळाली. शिवाय पूजाने स्वतःच्या हळदीत ‘बुमरो बुमरो’ या गाण्यावर ठेका धरलेला पाहायला मिळाला.
हळदीसाठी पूजाचा खास लूकही पाहायला मिळाला. दोघांनी जांभळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. तर इतर सर्व कुटुंबीय नातेवाईक व मित्रपरिवारांकरिता पिवळ्या रंगाची थीम ठेवण्यात आली होती. या हटके कलरमध्ये पूजा आणखीनच कलरफुल दिसत होती. जांभळ्या रंगाचा लेहेंगा चोळी परिधान करुन पूजाने हातात घातलेला हिरवा चुडा साऱ्यांचं लक्ष वेधून घेत होता. तर या लूकसाठी तिने पांढऱ्या रंगाच्या फुलांचे गजरे केसात माळलेले पाहायला मिळाले. पूजाचा हा खास लूक साऱ्यांच्याच पसंतीस पडला. अखेर पूजाला सिद्धेशच्या नावाची व सिद्धेशला पूजाच्या नावाची हळद लागलेली पाहायला मिळाली.
हळद लावताना पूजाला अश्रूही अनावर झाले. भावुक होत तिच्या डोळ्यात पाणी आले पाहायला मिळाले. याआधी पूजाच्या मेहंदी, संगीत सोहळ्याचे तसेच साखरपुड्याचे ही खास फोटो सोशल मीडियावरून व्हायरल झाले. प्रत्येक सोहळ्यासाठी तिने विशेष असा केलेला लूक लक्षवेधी ठरला.