शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अनेक पुरस्कार व प्रेक्षकांच्या प्रेमाने सन्मानित झालेला ‘ओपेनहायमर’ आता ओटीटी प्रदर्शनासाठी सज्ज, मोफत पाहता येणार, वाचा कधी व कुठे?

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 23, 2024 | 4:43 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Oppenheimer film will be released on the Jio Cinema OTT platform

अनेक पुरस्कार व प्रेक्षकांच्या प्रेमाने सन्मानित झालेला ‘ओपेनहायमर’ आता ओटीटी प्रदर्शनासाठी सज्ज, मोफत पाहता येणार, वाचा कधी व कुठे?

प्रसिद्ध हॉलिवूड दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनच्या ‘ओपेनहायमर’ या चित्रपटाचे समीक्षकांनी भरभरून कौतुक केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. किलियन मर्फीचा हा चित्रपट आता डिजिटल जगावरही राज्य करणार आहे. पुढील महिन्यात मार्चमध्ये हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. तर जाणून घ्या हा बहुचर्चित चित्रपट कधी व कुठे पाहता येणार?

काही दिवसांपूर्वीच ‘ओपनहायमर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि भारतात अनेक दिवस या चित्रपटाची प्रचंड चर्चा रंगली होती. अणूबॉम्बचे जनक जे. रॉबर्ट ओपनहायमर यांच्या जीवनावर हा चित्रपट बेतलेला असून भारतात या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले.

View this post on Instagram

A post shared by JioCinema (@officialjiocinema)

काही मीडिया रीपोर्टनुसार अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी माध्यमाने ‘ओपनहायमर’चे हक्क विकत घेतले असून याच माध्यमावर हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली होती. अशातच आता या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाबाबत एक नवीन अपडेट आली आहे.

आणखी वाचा – “अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या लागल्या आणि…”, खुशबू तावडेच्या नव्या बिजनेस सेटपला लागली भयानक आग, म्हणाली, “मी तिथे जाईपर्यंत…”

‘जिओ सिनेमा’ या ओटीटी माध्यमाने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटद्वारे ‘ओपनहायमर’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या २१ मार्चपासून हा चित्रपट जिओ सिनेमा या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित होणार आहे. तसेच इंग्रजी व हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये हाअ चित्रपट मोफत पाहायला मिळणार असल्याचंही स्पष्ट झालं आहे.

आणखी वाचा – ‘चला हवा येऊ द्या’मधून निलेश साबळेची एक्झिट, स्वतःच केला खुलासा, प्रकृती ठिक नसल्यामुळे मोठा निर्णय, म्हणाला, “गेले काही दिवस…”

दरम्यान, या चित्रपटाने प्रेक्षकांच्या प्रेमासह अनेक नामांकित पुरस्कारांवरदेखील आपली मोहोर उमटवली. ‘ओपनहायमर’ला अकादमी पुरस्कारांसाठी १३ नामांकने मिळाली. तर यंदाच्या ऑस्करसाठी सर्वाधिक नामांकने ओपनहायमर’लाच होती. लंडनमध्ये झालेल्या बाफ्टा फिल्म ओपनहायमर’ने ७ पुरस्कार जिंकले आणि क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड्स २०२४ मध्ये एकूण ८ श्रेणींमधील पुरस्कार जिंकले. तर गोल्डन ग्लोबमध्येही ‘ओपेनहायमर’ने एकूण ८ पैकी ५ नामांकन मिळवले.

Tags: entertainment newsHollywood MoviesOppenheimerOppenheimer OTT Newsott entertainment newsott newsOTT Releasedओटीटी प्रदर्शनओटीटी बातमीओपेनहायमरओपेनहायमर ओटीटी बातमीमनोरंजन बातमीहॉलिवूड चित्रपट
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Madhuri Dixit Emotional

Video : …अन् स्टेजवरच ढसाढसा रडू लागली माधुरी दिक्षित, उपस्थितांनाही रडू आवरेना, नेमकं काय घडलं?, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.