रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडकेच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, हळद दळतानाचे फोटो व्हायरल, ‘या’ ठिकाणी पार पडणार विवाहसोहळा

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 23, 2024 | 11:37 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Siddharth Bodke And Titeeksha Tawde Wedding

तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडकेच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, हळद दळतानाचे फोटो व्हायरल, 'या' ठिकाणी पार पडणार विवाहसोहळा

सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक जोड्या लग्नबंधनात अडकत आहेत. शिवानी सुर्वे-अजिंक्य ननावरे, गौतमी देशपांडे-स्वानंद तेंडुलकर, स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णी या जोड्या काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकल्या. यानंतर आता मराठी सिनेसृष्टीतील आणखी एक जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. प्रथमेश परब, पूजा सावंत या कलाकारांचीही लगीनघाई सुरु आहे. तर याचबरोबर टेलिव्हिजनवरील लोकप्रिय जोडी तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडकेही लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत. (Siddharth Bodke And Titeeksha Tawde Wedding)

गेल्या अनेक दिवसांपासून सिद्धार्थ व तितीक्षा या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु होत्या. अखेर काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. तितीक्षाने इन्स्टाग्रामवर सिद्धार्थबरोबरचा क्युट फोटो शेअर केला आहे. थेट केळवणाचे फोटो शेअर करत दोघांनी प्रेमात असल्याची कबुली देत लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे संकेत दिले. तेव्हापासून दोघांच्या लग्नाची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.

आणखी वाचा – “मराठीतच बोलणार कारण…”, हिंदी मालिकेसाठी पुरस्कार मिळताच स्टेजवर मराठीत बोलू लागली हेमांगी कवी, उपस्थितही ‘जय महाराष्ट्र’ बोलू लागले अन्…

तितीक्षा व सिद्धार्थच्या घरी लग्नाचे वारे वाहू लागले आहेत. सिद्धार्थने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक स्टोरी पोस्ट करत याबाबतचे अपडेट दिले आहेत. जात्यावर हळदकुंड बांधलेला एक फोटो त्याने शेअर करत लग्नापुर्वीच्या विधींना सुरुवात झाली असल्याचं समोर आलं आहे. शिवाय तितीक्षा व सिद्धार्थ सध्या केळवणाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील इशा डे व अभिनेत्री आकांक्षा गाडे या दोघींनी मिळून तितीक्षा व सिद्धार्थच्या केळवणाचा कार्यक्रम पार पाडला.

आणखी वाचा – “मराठी मातीतला अस्सल हिरा…”, मुख्यंमत्री एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्र भूषण अशोक सराफांचं केलं कौतुक, म्हणाले, “यश, पैसा, प्रसिद्धी अन्…”

याआधीही तितीक्षा व सिद्धार्थच्या केळवणाचे फोटो समोर आले. अशातच आता त्यांच्या लग्नापुर्वीच्या विधींनादेखील सुरुवात झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. सिद्धार्थ व तितीक्षा यांच्या शुभविवाह ठाणे येथे पार पडणार असल्याची चर्चा आहे. तितीक्षा व सिद्धार्थ ल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत प्रेम व्यक्त करत होते. पण त्यांनी कधीच आपल्या नात्याची माहिती उघडपणे सांगितली नाही. ‘असे हे कन्यादान’, ‘तू अशी जवळी रहा’ या मालिकांमध्ये तितीक्षा व सिद्धार्थ यांनी एकत्र काम केलं आहे.

Tags: entertainmentmarathi actormarathi actressSiddharth Bodke And Titeeksha TawdeSiddharth Bodke And Titeeksha Tawde WeddingSiddharth Bodke wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Prathamesh Parab wife kshitija ghosalkar pre-marriage rituals start video viral on social media

Video : श्रीवर्धनची आहे प्रथमेश परबची होणारी बायको, पारंपरिक पद्धतीने गावामध्ये करत आहे लग्नापूर्वीच्या विधी, मांडव स्थापना अन्...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.