रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

जन्मतःच सोशल मीडिया स्टार झाला विराट कोहली-अनुष्का शर्मा यांचा लेक, नेमकं काय घडलं?, लोकही आश्चर्यचकित अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 21, 2024 | 4:35 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Anushka and Virat new born baby

जन्मतःच सोशल मीडिया स्टार झाला विराट कोहली-अनुष्का शर्मा यांचा लेक, नेमकं काय घडलं?, लोकही आश्चर्यचकित अन्...

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने काही दिवसांपूर्वीच मुलाला जन्म दिला. विराट व अनुष्काने याबाबतची पोस्ट इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. यामध्ये त्यांनी आपल्या मुलाचे नाव ‘अकाय’ असे ठेवले असल्याचं सांगितले. बाळाच्या आगमनाच्या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दोघांनाही आधी एक मुलगी असून तिचे नाव ‘वामिका’ आहे. विराट-अनुष्काच्या दुसऱ्या बाळाचे आगमन होताच चाहत्यांनी त्याला सोशल मीडियाचा स्टार बनवलं आहे. (Anushka and Virat new born baby)

विराट व अनुष्का यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. यासह दोघांच्या नावांनी तसेच मुलगी वामिकाच्या नावानेदेखील अनेक फॅनपेज आहेत. पण आताच आलेल्या ज्युनिअर कोहलीच्या म्हणजे अकायच्या नावाने अनेक फॅनपेज सुरू करण्यात आले आहेत. ‘रेडिट’वर एका युजरने पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ‘काही मिनिटांतच इन्स्टाग्रामवर अकाय कोहलीच्या अकाऊंट्सचा अक्षरशः पुर आला आहे” असे लिहिण्यात आले आहे.

आणखी वाचा – प्रकृती बिघडल्यानंतर रुग्णालयामध्ये पोहोचल्या नीना गुप्ता, तिथेही धर्म विचारल्यावर भडकल्या, म्हणाल्या, “देवा…”

View this post on Instagram

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

दरम्याने विराट व अनुष्का या जोडीने लंडनमध्ये दुसऱ्या बाळाला जन्म दिला. जन्म दिल्यानंतर पाच दिवसांनी मुलगा झाल्याची पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, “आम्हाला खूप आनंद होत आहे. १५ फेब्रुवारीला आम्ही आमचा मुलगा अकाय व वामिकाच्या लहान भावाचे या जगात स्वागत केले आहे. आमच्या जीवनातील या सुंदर क्षणांना तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा राहू देत. आमच्या गोपनियतेचा सन्मान कराल अशी विनंती करतो. प्रेम व आभार”. इन्स्टाग्रामवर पोस्ट व्हायरल होताच मुलगा अकायच्या नावाचा नेमका अर्थ काय? अशी चर्चादेखील रंगली.

आणखी वाचा – Video : ऋतुराज सिंह यांच्या अंत्यदर्शनाला कुटुंबियांची बिकट अवस्था, उपस्थितही हळहळले, कलाकारांची तुफान गर्दी अन्…

अनुष्का व विराट यांनी ११ डिसेंबर २०१७ रोजी इटली येथे कुटुंबियांच्या साक्षीने लग्नगाठ बांधली. २०२१ रोजी अनुष्काने एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिचे नाव ‘वामिका’ ठेवलं. पण या जोडीने दुसऱ्या बाळाच्या बातमीबाबत मौन पाळलं होतं. गेले कित्येक महिने अनुष्काच्या प्रेग्नंसीच्या बऱ्याच चर्चा रंगल्या. अखेरीस सुंदर पोस्ट शेअर करत विराट-अनुष्काने त्यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झालं असल्याचं जाहिर केलं आहे.

Tags: anushka sharmababyInstagram accountsnew born babysecond childvirat kohali
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Skincare Routine Update

चेहऱ्यावरील काळे डाग-मुरुम होतील गायब, त्वचाही होईल सुंदर, 'हा' सोपा उपाय केल्यामुळे पडेल सौंदर्यात भर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.