मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रकृती बिघडल्यानंतर रुग्णालयामध्ये पोहोचल्या नीना गुप्ता, तिथेही धर्म विचारल्यावर भडकल्या, म्हणाल्या, “देवा…”

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 21, 2024 | 1:59 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Neena gupta angry story

प्रकृती बिघडल्यानंतर रुग्णालयामध्ये पोहोचल्या नीना गुप्ता, तिथेही धर्म विचारल्यावर भडकल्या, म्हणाल्या, “देवा...”

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता अनेकदा त्यांच्या विधानांमुळे सतत चर्चेत असतात. नीना यांनी बॉलिवूडमध्ये अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये कमालीच्या भूमिका केल्या. सध्या त्या दिल्लीमध्ये असून त्यांची प्रकृती बिघडली असल्याचे वृत्त होते. नीना तपासणी करण्यासाठी रुग्णालयामध्ये पोहोचल्या. यादरम्याने रुग्णालयामध्ये अशी काही घटना घडली ज्यामुळे त्यांचा संताप झाला. त्यांनी स्वतः रुग्णालयामधील संपूर्ण घटना उघडकीस आणली. त्यांच्याबरोबर नक्की काय झाले हे जाणून घेऊया. (Neena gupta angry story )

‘आज तक’च्या वृत्तानुसार, नीना या तपासणी करण्यासाठी गुरुग्राममधील एका रुग्णालयामध्ये पोहोचल्या होत्या. यादरम्याने तपासणीआधीच त्यांना भलामोठा फॉर्म भरण्यासाठी दिला. तब्येत खराब असतानाही इतकी मोठी प्रक्रिया करायला लावली त्यामुळे त्या संतापल्या. पण फॉर्ममध्ये इतर माहितीबरोबरच धर्म विचारल्याने त्यांना अधिक राग आला. रुग्णालयाच्या या प्रकाराबद्दल नीना यांनी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला आहे. घडल्या प्रकाराबाबत नीना यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या म्हणाल्या की, “मी एका नामांकित रुग्णालयामध्ये आले आहे. नोंदणीचा फॉर्म भरत आहे. हा फॉर्म भरता भरता मी अजूनच आजारी पडेन. तशी मी इतकीही आजारी नाही. पण मी हा फॉर्म भरत आहे. आता इथे एक कॉलम आहे ज्यामध्ये माझा धर्म विचारला आहे”.

आणखी वाचा – Video : हातगाडीवर नाश्ताचे पदार्थ विकत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ बघत होती महिला, प्रियदर्शिनी इंदलकरने पाहिलं अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

नोंदणी फॉर्म भरताना नीना यांनी धर्माचा कॉलम पाहिला आणि त्या अधिक संतापल्या. त्यावर त्या म्हणाल्या की, “अरे हे तर अजून होत आहे. देवा! आता आमचं काय होईल”. नीना यांनी रुग्णालयामध्ये जातानाचा अजून एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यामध्ये त्या १० मिनिटे ट्रॅफिकमध्ये अडकल्या होत्या.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्रीची कर्करोगाशी झुंज, बिकट अवस्थेमध्ये रुग्णालयामध्ये भरती, मरण नको म्हणत शेअर केली पोस्ट, म्हणाली, “तुम्ही माझ्यासाठी…”

नीना या नुकत्याच ‘मस्त मे रहने का’ या चित्रपटामध्ये जॅकी श्रॉफ यांच्यासह दिसून आल्या होत्या. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. आता नीना ‘पंचायत ३’ या वेबसीरिजमध्ये दिसणार आहेत. ‘पंचायत’ वेबसीरिजच्या पहिल्या दोन भागांमधील यांच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक केले होते.

Tags: neena guptaneena gupta angryneena gupta storysocial media post
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरजच्या बाळाला भेटायला गेली, हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली अन्…; जान्हवीच्या ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

सप्टेंबर 8, 2026 | 12:19 pm
Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Next Post
Bollywood Celebrity Children Name

अनुष्का-विराटच्या लेकाच्या नावाप्रमाणेच 'या' कलाकारांच्या मुलांचीही आहेत अनोखी नावं, वामिकापासून ते राहापर्यंत, काय आहे नावांचा अर्थ?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.