छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘नवा गडी नवं राज्य’. या मालिकेतील सर्वच पात्रांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. मालिका सुरु झाल्यापासून या मालिकेला आणि मालिकेतील पात्रांना अक्षरशः रसिक प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरले आहे. या मालिकेचे कथानक हे कौटुंबिक असलं तरी रोजच्या जीवनापेक्षा वेगळे कथानक यांत हाताळले जात आहे. नात्यामधली भावनिक गुंफण कालांतराने कसे पदर उलगडते याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘नवा गडी नवं राज्य’. (nava gadi nava rajya)

जस संसार म्हटलं की त्यात चढ उतार आले तसंच मालिकेच्या बाबतीतही आहे. कधी सुखाच्या सरी तर कधी दुःखाचा डोंगर करून समोर असलेल्या मालिका आपण एकटक पाहतो. अशीच एक लोकप्रिय मालिका म्हणजे ‘नवा गडी नवं राज्य’. या मालिकेतील आनंदी लग्नानंतर आपल्या नवऱ्याला आणि त्याच्या कुटुंबाला कसं सामावून घेते आणि आपलंस करते हे आपण पाहिलंच. ज्यावेळी राघवला आनंदीची किंमत कळते त्यानंतर तो आनंदीवरील त्याच प्रेमही व्यक्त करतो. आनंदी आणि राघव यांच्यात सर्वकाही सुरळीत सुरु असताना त्यांच्या सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागते आणि सर्वकाही बिघडतं.
पहा आनंदी राघवच्या संसारात पडणार का फूट (nava gadi nava rajya)
ज्यावेळी आनंदी रमाच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी राघवला रमाच्या अस्तित्वाची जाणीव करून देते. त्यानंतर राघव आनंदीमुळे रमाजवळ येतो. आनंदीचा वापर करून तो रमाच्या संपर्कात राहतो. रमा फक्त आनंदीला दिसते ही गोष्ट राघवने मान्य केली असली तरी रमा आनंदीला लग्नाच्या दिवसापासून दिसते ही गोष्ट राघवपासून लपवून ठेवली म्हणून तो आनंदीला दोष देतो आणि स्वार्थी ठरवतो.
आनंदीने स्वतःच स्थान मिळवण्यासाठी रमाचा वापर केला, राघवच्या जवळ जाण्यासाठी आनंदीने ही गोष्ट लपवून ठेवली असे आरोप तो आनंदीवर करतो. रमा आपल्या अस्तित्वाची जाणीव राघवला झाली म्हणून आनंदी आणि राघव दुरावले असा विचार करून स्वतःला दोषी ठरवते.(nava gadi nava rajya)
====
हे देखील वाचा – ‘मी मूळचा कलावंत नव्हे..’ असे म्हणणाऱ्या दादा कोंडकेंनी गाजवलं सिनेविश्वात एक युग
====
आनंदीने राघवपासून रमाचे अस्तित्व लपवून स्वतःचा फायदा केला अशा गैरसमजात राघव अडकलेला असतो. आता आनंदी राघवचा हा गैरसमज दूर करेल का? की रमा आनंदी आणि राघव यांच नातं पुन्हा सुरळीत होण्यासाठी स्वतःच निघून जाईल, हे पाहणे मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.
