मराठमोळा अभिनेता अमेय वाघ याची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेमुळे घराघरातील तरूणाईला अमेय वाघची ओळख झाली,त्यानंतर त्याने अनेक चित्रपट आणि वेबसिरीजमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. अमेय जितका उत्तम अभिनेता आहे, तितका उत्तम विनोदबुद्धी असलेला माणूस आहे. त्याच्या अनेक पोस्ट वाचल्यावर तुम्हालाही हे पटेल.अमेय सोशल मीडियावर नेहमी अक्टिव्ह असलेला पाहायला मिळतो.तो नेहमी त्याच्या नवनवीन प्रोजेक्टची माहिती चाहत्यांना देत असतो. अश्यातच त्याने एक गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. अमेय आता लवकरच बॉलीवूडमध्ये मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.(Amey Wagh)
अमेयने मुरांबा, झोंबिवली, कारखानीसाची वारी, गर्लफ्रेंड अश्या अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. तसेच त्याने काही हिंदी वेबसिरीजमध्ये देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. पण आता अमेयचा मुख्य भूमिका असलेला पहिला बॉलिवूड चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ही माहिती स्वतः अमेयने त्याच्या इंस्टाग्रामवरून शेअर करत दिली आहे. ‘बेहिसाब’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचा क्लप बोर्ड शेअर करत, माझी पहिली मुख्य भूमिका असलेला हिंदी चित्रपट, या चित्रपटाबद्दल मी खूप उत्सुक आहे. म्हणूनच या चित्रपटाला बेहिसाब म्हटलंय असं लिहिलंय.

====
हे देखील वाचा :आईच्या निधनांनंतर माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने भावूक, पोस्ट करत व्यक्त केल्या भावना
====
तसेच अमेयने पुढे म्हटलं आहे की, तपशील लवकरच फॉलो करेल..तोपर्यंत कृपया तुमचे बेहिसाब प्रेम आणि शुभेच्छा, आशीर्वाद आमच्यावर राहू द्या. अमेयने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक चाहत्यांसोबत कलाकारांनी देखील शुभेच्छांचा वर्षाव केला. समीर पाटील हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून कठपुतळी या निर्मिती संस्थेद्वारे लक्ष्मण उत्तेकर हे या चित्रपटाचे निर्मिती करणार आहेत. तसेच या चित्रपटाची कथा आणि अमेयसोबत आणखी कोणते कलाकार असणार हे जाणून घेण्यासाठी सध्या चाहते उत्सुक आहेत. तसेच अमेय चित्रपटात कोणत्या भूमिकेत झळकणार हे पाहणं ही रंजक ठरेल.(Amey Wagh)
अलीकडेच अमेयच जग्गू आणि ज्युलिएट हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याने जग्गू या आगरी कोळी मुलाची भूमिका झंकारली होती. त्याच्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे.