रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“इतक्या वाईट प्रसंगामध्ये…”, ऋतुराज सिंह यांच्या निधनानंतर ‘अनुपमा’ फेम रुपाली गांगुलीला मोठा धक्का, म्हणाली, “तुमचा फोटो…”

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 20, 2024 | 4:01 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Rupali Ganguly post on Rituraj singh

“इतक्या वाईट प्रसंगामध्ये...”, ऋतुराज सिंह यांच्या निधनानंतर ‘अनुपमा’ फेम रुपाली गांगुलीला मोठा धक्का, म्हणाली, “तुमचा फोटो...”

हिंदी मालिकांमधील ज्येष्ठ अभिनेते ऋतुराज सिंह यांच्या निधनानंतर मालिकाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. ऋतुराज ‘अनुपमा’ या हिंदी मालिकेमध्ये यशपालची भूमिका करत होते. हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ५९व्या वर्षी लोखंडवाला येथे राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या आकस्मिक निधनाने टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये शोककळा पसरली आहे. बॉलिवूड तसेच मालिकांमधील कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. (Rupali Ganguly post on Rituraj singh)

सुप्रसिद्ध मालिका ‘अनुपमा’मध्ये ऋतुराज यांनी साकारलेली भूमिका विशेष गाजली. या मालिकेमध्ये त्यांनी अनुपमाच्या बॉसची भूमिका केली होती. मालिकेची नायिका रुपाली गांगुलीने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट केली आहे. रुपालीने या पोस्टमध्ये म्हंटले आहे की, “प्रिय सर, तुमच्याबरोबर काम करणे माझ्यासाठी सन्मानाची बाब होती. मला तुमच्याकडून एक विद्यार्थी म्हणून अभिनय आणि आयुष्यातील अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. मी खूप खुश होते. एकदा तुम्ही म्हणाला होतात की, तुम्ही माझे काम पाहिले आहे आणि तरीही मला हे सिद्ध करायचं होतं की ज्या दिग्गज कलाकारांना मी काम करताना पाहिले त्यांच्याबरोबर मला काम करायचे आहे”.

आणखी वाचा – “रील बनवण्याकडे कलाकारांचं अधिक लक्ष अन्…”, विक्रांत मेस्सीचा संताप, म्हणाला, “बेजबाबदार…”

View this post on Instagram

A post shared by Rups (@rupaliganguly)

पुढे रुपाली म्हणाली की, “मालिकेच्या सेटवर तुमचे हास्य हेच माझ्यासाठी चांगल्या कामाची पोचपावती होती. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढत होता. पण मी तुमच्याबरोबर राहून अनेक गोष्टी शिकू शकले. तुमचा हा फोटो मी तेव्हा काढला होता जेव्हा तुम्ही शेफची टोपी घातली होती. मी तेव्हा हा फोटो तुम्हाला पाठवू शकले नाही. पण इतक्या वाईट प्रसंगामध्ये तुमचा हा फोटो समोर येईल असं मुळीच वाटलं नव्हतं. तुमचं आयुष्य, विनोदशैली, चित्रपटांबद्दलचे ज्ञान हे नेहमीच लक्षात राहील. ‘अनुपमा’मध्ये यशपालची भूमिका केल्याबद्दल तुमचे आभार. त्या सर्व शब्दांसाठी धन्यवाद ज्यामुळे मी आयुष्यात पुढे जाऊ शकले. तुमच्या आत्म्यास शांती मिळो. ओम शांती ओम”.

आणखी वाचा – ‘दंगल’मधील सुहानी भटनागरच्या शोकसभेला स्वतः बबिता फोगटची उपस्थिती, भावना अनावर, म्हणाली, “घरी जाऊन…”

रुपालीबरोबरच अभिनेत्री दीपिका सिंहही म्हणाली की, ”मी त्यांना चांगले ओळखते. मी त्यांना केवळ एकदाच भेटले आहे. एका भेटीमध्येच ते एकदम खरे वाटले. मला त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा होती. पण आता हे कधीही शक्य होणार नाही”. ऋतुराज यांच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे.

Tags: Rituraj SinghRituraj Singh DeathRupali gangulyrupaly ganguly Instagram post
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Prasad Oak And Amruta Khanvilkar

प्रसाद ओकला अमृता खानविलकरने गिफ्ट केलं महागड घड्याळ, अभिनेत्याने फोटोही केला पोस्ट, म्हणाला…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.