रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रसाद ओकला अमृता खानविलकरने गिफ्ट केलं महागड घड्याळ, अभिनेत्याने फोटोही केला पोस्ट, म्हणाला…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 20, 2024 | 4:05 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Prasad Oak And Amruta Khanvilkar

प्रसाद ओकला अमृता खानविलकरने गिफ्ट केलं महागड घड्याळ, अभिनेत्याने फोटोही केला पोस्ट, म्हणाला...

अनेक मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन करुन आशयघन विषय प्रेक्षकांसमोर मांडत बॉक्स ऑफिसवर बक्कळ कामे करणारा अभिनेता, दिग्दर्शक म्हणजे प्रसाद ओक. ‘कच्चा लिंबू’, ‘हिरकणी’, ‘चंद्रमुखी’ यांसारख्या मोठ्या चित्रपटांच्या दिग्दर्शनाची धुरा प्रसादने सांभाळत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. याशिवाय अनेक चित्रपटांमध्येही प्रसादने महत्त्वपूर्ण भूमिका साकारत रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली. सध्या प्रसाद आनंद दिघे यांच्या जीवनपटावर आधारित ‘धर्मवीर २’ मध्ये भूमिका साकारत आहे. (Prasad Oak And Amruta Khanvilkar)

काही दिवसांपूर्वीच प्रसाद ओकचा वाढदिवस झाला. प्रसादच्या वाढदिवसानिमित्त सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर प्रसाद बऱ्यापैकी सक्रिय असतो. चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी प्रसाद व त्याची पत्नी मंजिरी नेहमीच मजेशीर व्हिडीओ बनवून चाहत्यांसह शेअर करत असतात. प्रसाद व मंजिरीने एकमेकांना साथ देत सिनेसृष्टीतील त्यांचं स्थान निर्माण केलं आहे.

आणखी वाचा – “दंड भरुन सुटका…”, कुत्र्यांना मारहाण करणाऱ्या आरोपींची सुटका झाल्यानंतर सिद्धार्थ चांदेकरसह मराठी कलाकार भडकले, म्हणाले, “गुन्हेगार…”

प्रसादच्या वाढदिवसानिमित्त त्याची सहकलाकार अमृता खानविलकरने त्याला खास शुभेच्छा देत पोस्ट शेअर केली होती. प्रसाद व अमृताने मिळून बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखी चित्रपटातील अमृता खानविलकरच्या चंद्रा या भूमिकेने अभिनेत्रीला विशेष लोकप्रियता मिळाली. याशिवाय लवकरच प्रसाद व अमृता त्यांच्या आगामी पठ्ठे बापूराव या चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहेत. प्रसाद व अमृता यांचं सेटवर वा चित्रीकरणादरम्यान काम करताना एक उत्तम बॉण्डिंग असलेलं पाहायला मिळालं आहे, तसेच त्यांचं खासगी आयुष्यातही मैत्रीपूर्ण नातं असल्याचं पाहायला मिळतं.

आणखी वाचा – ऋतुराज सिंह यांच्या निधनानंतर शाहरुख खानबरोबरचा फोटो चर्चेत, SRKच्या आग्रहाखातर मुंबईत आले अन्…; काय घडलं होतं?

प्रसादच्या वाढदिवसानिमित्त अमृताने अभिनेत्याला खास गिफ्ट दिलेलं पाहायला मिळत आहे. प्रसादने अमृताने दिलेल्या या खास भेटवस्तूचा फोटो शेअर केला आहे. अमृताने प्रसादसाठी वाढदिवसानिमित्त खास घड्याळ भेटवस्तू म्हणून दिलं आहे. हा फोटो शेअर करत प्रसादने अमृताला टॅग केलं असून हार्ट इमोजी शेअर केले आहेत. प्रसादसाठी अमृताने दिलेली ही भेटवस्तू खास असल्याचं त्याच्या पोस्टवरुन कळत आहे.

Tags: amruta khanvilkarentertainmentmarathi actormarathi actressPrasad Oak Birthdayprasad oak birthdaygiftprasad oak on amruta khanvilkar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
rituraj singh death Arshad warsi, sneha wagh, sandeep sikand celebs reaction paid tribute to the actor

"चांगला अभिनेता गमावला", ऋतुराज सिंह यांच्या अचानक निधनामुळे कलाकारांनाही भावना अनावर, म्हणाले, "खूपच दुःख होतं जेव्हा..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.