रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Rituraj Singh Passes Away : ‘अनुपमा’ फेम ऋतुराज सिंह यांच्या निधनामागचं नेमकं कारण काय?, जवळच्या मित्राने सांगितलं सत्य, म्हणाला, “उपचारानंतर रुग्णालयातून घरी आणलं अन्…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 20, 2024 | 1:45 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Rituraj Singh Passes Away

Rituraj Singh Passes Away : 'अनुपमा' फेम ऋतुराज सिंह यांच्या निधनामागचं नेमकं कारण काय?, जवळच्या मित्राने सांगितलं सत्य, म्हणाला, "उपचारानंतर रुग्णालयातून घरी आणलं अन्…"

Rituraj Singh Death : सध्या सिनेसृष्टीतून एकामागोमाग एक दुःखद बातम्या समोर येताना पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच आमिर खानच्या दंगल चित्रपटातील छोट्या बबिता फोगटच्या निधनाच्या बातमीने साऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. यापाठोपाठ आता मालिकाविश्वातील आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याच्या निधनाच्या बातमीने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ अभिनेते ऋतुराज सिंह यांच्या निधनाच्या बातमी समोर येताच साऱ्यांना खूप मोठा धक्का बसला. वयाच्या ५९ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं असल्याचं समोर आलं.

ऋतुराज यांना मुंबईतील लोखंडवाला येथील राहत्या घरी हृदयविकाराचा झटका आला. या अभिनेत्याच्या आकस्मिक निधनाने टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. तसेच अभिनेत्याच्या चाहत्यांनाही चांगलाच धक्का बसला आहे. ‘इटाइम्स’च्या वृत्तानुसार, ऋतुराजचा मित्र अमित बहल याने अभिनेत्याच्या मृत्यूबाबत भाष्य केलं आहे. ऋतुराज यांच्याबाबत शोक व्यक्त करत तो म्हणाला, “होय, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. स्वादुपिंडाच्या उपचारासाठी त्यांना काही वेळापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर घरी आल्यावर त्यांना हृदयविकाराचा त्रास झाला आणि त्यांचे निधन झाले.”

आणखी वाचा – “मोलकरणीच्या मुलांबरोबर तुमची मुलं शिकतील…”, सुप्रसिद्ध मराठी जोडप्याने मुलांना मराठी शाळेत घातल्यामुळे ट्रोल, अभिनेत्री म्हणाली, “शिव्या देतात असं…”

I am so saddened to know that Ritu Raj passed away. We lived in the same building, he was a part of my first film as a producer. Lost a friend and a great actor… will miss you brother…

— Arshad Warsi (@ArshadWarsi) February 20, 2024

ऋतुराज टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘अनुपमा’मध्ये दिसला होता. या मालिकेतील त्याची भूमिका विशेष चर्चेत राहिली. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेमध्येही या अभिनेत्याने भूमिका साकारली होती. ९०च्या दशकात झी टीव्हीवरील ‘तोल मोल के बोल’ हा रिॲलिटी गेम शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ऋतुराज सिंह यांनी टीव्हीवरील अनेक मालिका, अनेक चित्रपट व ओटीटी शोमध्ये काम केले होते. ‘हिटलर दीदी’, ‘ज्योती’, ‘शपथ’, ‘अदालत’, ‘आहट’, ‘दिया और बाती’, वॉरियर हाय’, ‘लाडो 2’ यांसारख्या मालिकांमध्येही त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

आणखी वाचा – “बायकोवर विश्वास नाही आणि…”, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’वर प्रेक्षक नाराज, अधिपतीलाही केलं ट्रोल, म्हणाले, “चुकीच्या गोष्टींना…”

सोशल मीडियावर अनेक चाहते अश्रूपूर्ण डोळ्यांनी अभिनेत्याला श्रद्धांजली अर्पण करत आहेत. त्याचवेळी अनेक सेलिब्रिटी देखील अभिनेत्याच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत.

Tags: entertainmentRituraj SinghRituraj Singh DeathRituraj Singh Passes Away due to heart attackTV Actor Rituraj Singh Death News in Marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
siddharth chandekar and Hemant dhome reacted on thane pet dog incident animal abuse viral video see the details

"दंड भरुन सुटका…", कुत्र्यांना मारहाण करणाऱ्या आरोपींची सुटका झाल्यानंतर सिद्धार्थ चांदेकरसह मराठी कलाकार भडकले, म्हणाले, "गुन्हेगार…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.