अभिनेत्री श्वेता तिवारीचं सौंदर्य दिवसागणिक वाढत आहे. वयाच्या ४३व्या वर्षीही श्वेता प्रचंड ग्लॅमरस दिसते. सोशल मीडियावरदेखील श्वेताचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. श्वेताने अनेक बॉलिवूड सिनेमा आणि मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या जरी श्वेता अभिनयापासून दूर असली तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी चाहत्यांशी संवाद साधत असते. श्वेता आता गोव्यामध्ये आपल्या कुटुंबासह वेळ घालवत असून नुकताच तिने एका मुलाबरोबरचा फोटो शेअर केला आहे. ज्याकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे. (Shweta Tiwari Post)
श्वेता सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांसमोर येत असते. श्वेता दोन मुलांची आई असून तिला २३ वर्षाची मुलगी आणि ७ वर्षांचा मुलगा आहे. श्वेताची मुलगी पलकने चित्रपटसृष्टीमध्ये ‘किसी का भाई किसी की जान’ मधून पदार्पण केले. नुकताच तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एका मुलाबरोबरचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये श्वेता सदर मुलाच्या गालाला गाल लावून मिरर सेल्फी घेत आहे आणि त्यावर तिने ‘गोव्यातील सनसेट आणि बीच वाईब’ असे कॅप्शन दिले आहे. तसेच ‘आई व मुलगा’ असा हॅशटॅगदेखील दिला. यावरून फोटोमध्ये असणारा मुलगा नक्की कोण? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला.
श्वेताने जो फोटो शेअर केला त्या फोटोमध्ये दोघांचेही नाते हे आई आणि मुलाचे आहे असं दिसत आहे. फोटोमधील मुलगा हा वरुण कस्तुरीया असून ‘काव्या-एक जज्बा एक जुनून’ या मालिकेमध्ये श्वेताच्या मुलाची भूमिका केली होती. तेव्हापासूनच श्वेता व वरुणमध्ये सुंदर नाते तयार झाले. अनेकदा वरुण आपल्या मुलाखतीमध्ये श्वेताचे कौतुक करतानादेखील दिसतो.
श्वेताने शेअर केलेल्या फोटोवर संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. काही नेटकरी म्हणतात की, “संतूर मम्मी”. दुसरा नेटकरी म्हणतो की, “हे दोघं कोणत्या अँगलने आई आणि मुलगा आहेत?,” तसेच काही नेटकरी म्हणतात की, ”संतूरवाली मम्मी भेटली”. श्वेता व वरुणच्या नात्यावर वाईट कमेंट करणाऱ्यांना श्वेताच्या चाहत्यांनी खडेबोल सुनावले आहेत.