मंगळवार, जून 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दीपिका पदुकोणने साडीच्या पदराने लपवलं पोट, अभिनेत्री लवकरच देणार गुडन्यूज?, व्हिडीओ व्हायरलनंतर चर्चांना उधाण

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 19, 2024 | 6:08 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Deepika Padukone saree look

दीपिका पदुकोणने साडीच्या पदराने लपवलं पोट, अभिनेत्री लवकरच देणार गुडन्यूज?, व्हिडीओ व्हायरलनंतर चर्चांना उधाण

मनोरंजन विश्वातील प्रतिष्ठित मानला जाणारा ‘बाफ्टा २०२४’ पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. जगभरातील चाहते आणि कलाकार या पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत होते. ‘ब्रिटिश अकादमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स’ अर्थात ‘बाफ्टा’च्या यंदाच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये अनेक कलाकारांचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळाला. या पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि कलाकारांना गौरविण्यात येते. पण या वर्षीचा ‘बाफ्टा’ पुरस्कार सोहळा भारतीयांसाठी अगदी खास होता. या पुरस्कार सोहळ्यासाठी केवळ हॉलिवूड स्टार्सनीच नाही तर बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोणनेदेखील पुरस्कार प्रदान करण्यासाठी हजेरी लावली होती. दीपिकाच्या भारतीय लूकने सर्वांचेच लक्ष वेधले गेले. या पुरस्कार सोहळ्यात पुन्हा एकदा ‘ओपनहायमर’ या चित्रपटाची धूम पाहायला मिळाली. या चित्रपटाने अनेक पुरस्कार पटकावले. (Deepika Padukone saree look)

दीपिकाने २००७ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. दीपिकाने बॉलिवूडमध्ये काम करण्याबरोबरच अभिनयाच्या जोरावर हॉलिवूडमध्येही आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘बाफ्टा २०२४’ च्या निमित्ताने दीपिकाने ऑफ व्हाईट रंगाची चमकदार साडी नेसली होती. या साडीमध्ये दिपीकाचा कातिलाना अंदाज दिसून येत होता. पण दीपिकाचा साडीमधील फोटो व्हायरल झाल्यापासून ती गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

आणखी वाचा-आमिर खानने ‘दंगल’मधील छोट्या बबीता फोगटला लेकीच्या लग्नाचं दिलं होतं निमंत्रण, सुहानीच्या आईचा मोठा खुलासा, म्हणाल्या, “आजाराबद्दल त्यांना…”

View this post on Instagram

A post shared by दीपिका पादुकोण (@deepikapadukone)

‘बाफ्टा २०२४’ च्या पुरस्कार सोहळ्याला हॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांसमवेत भारतीय अभिनेत्री दीपिकाने हजेरी लावली होती. यावेळी दीपिकाने फिक्या पांढऱ्या रंगाची चमकदार साडी नेसली होती. पण जेव्हा ती फोटोसाठी पोज देत होती तेव्हा तिने पोटावर पदर घेतला. दीपिकाचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरी अनेक तर्कवितर्क मांडत आहेत. याबद्दल एक नेटकरी म्हणाला की, “दीपिका गरोदर आहे असं वाटतं, तिचे पोट दिसत आहे आणि तिच्या हाताची ठेवणही तशीच काहीशी आहे”.

आणखी वाचा-“त्या कलाकाराला सगळ्यांनी मानाचा मुजरा केला पण मी…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितली ‘ती’ घटना, म्हणाली, “फक्त महाराजांनाच…”

यावर इतर नेटकऱ्यांनीदेखील कमेंट करत म्हंटले की, “हा चर्चा करण्याचा विषय नाही”. तर काही नेटकरी म्हणाले की, “तिने सब्यासाची ब्रँडची साडी नेसली आहे आणि ती जड असल्याने निऱ्या झाकण्यासाठी पदर असा घेतला आहे”. तर काही नेटकऱ्यांचे असे म्हणणे आहे की, “दीपिका-कतरिना आपल्या साडीचा पदर अशाच पध्दतीने पकडतात. त्यामुळे त्या गरोदर असल्याच्या चर्चा केल्या जातात”. पण यामागचं सत्य नेमकं काय? हे अद्यापही उघड झालेलं नाही.

Tags: actress deepika padukoneactress lookbafta awardbafta award 2024deepika padukonesaree lookviral post
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Shweta Tiwari Post

दोन घटस्फोट, दोन मुलं अन्…; ४०शीनंतरही श्वेता तिवारी सहकलाकाराला करत आहे डेट, रोमँटिक फोटो समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.