शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

येत्या आठवड्यात ओटीटी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी, अ‍ॅक्शन, थरार अन् सस्पेन्सवर आधारित सीरिज व चित्रपट होणार प्रदर्शित, पाहा संपूर्ण यादी

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 18, 2024 | 1:54 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Avatar the last airbender poacher malaikottai vaaliban the indrani mukherjea story buried truth upcoming ott releases of this week

येत्या आठवड्यात ओटीटी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी, अ‍ॅक्शन, थरार अन् सस्पेन्सवर आधारित सीरिज व चित्रपट होणार प्रदर्शित, पाहा संपूर्ण यादी

ओटीटी प्लॅटफॉर्मने चित्रपट व वेबसीरिज पाहण्याच्या अनुभवात अनेक बदल घडवून आणले आहेत. डिस्नी प्लस हॉटस्टार, अ‍ॅमेझोन प्राइम, जिओ सिनेमा, प्राइम व्हिडिओ आणि यांसारख्या अनेक ओटीटी माध्यमांवर दर आठवड्याला नवीन कलाकृती प्रदर्शित होत असतात. तुम्हीही अशा रंजक चित्रपट व वेबसीरिजच्या शोधात असाल तर जाणून घ्या, या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट व सीरिजची यादी.

अवतार द लास्ट एअरवेंडर : ‘अवतार द लास्ट एअरवेंडर’मध्ये जबरदस्त ॲक्शन पाहायला मिळणार आहे. या मालिकेची कथा जगातील चार राष्ट्रांभोवती केंद्रित आहे, जे अतिशय प्रेमाने जगले. पण, फायरनेशन हल्ल्यानंतर सर्व काही बदलते आणि फायरबेंडर्स जग जिंकण्यासाठी निघतात अशी या सीरिजची कथा आहे. येत्या २२ फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी माध्यमावर ही सीरिज प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा – Video : ‘तेरी मेरी यारियां!’ पूजा सावंतच्या साखरपुड्यात मित्र-मैत्रिणींची मज्जा-मस्ती, प्रार्थना बेहेरेने शेअर केले खास क्षण

मलाइकोट्टई वालीबान : ‘मलाईकोट्टाई वालीवान’ एका दिग्गज माणसाच्या जीवनाभोवती फिरते कारण तो आपल्या संघर्ष आणि यशाने पुढच्या पिढीसाठी मार्ग तयार करतो. या चित्रपटात मोहनलाल, सोनाली कुलकर्णी, हरीश पेराडी, मनोज मोसेस, कथा नंदी, दानिश सेत आणि मणिकंदन आचारी यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी माध्यमावर येत्या २३ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

पोचर : पोचर ही सत्य घटनांवर आधारित एक सीरिज आहे. केरळमध्ये ९०च्या दशकाच्या सुरुवातीस हत्तींच्या निर्दयी हत्यांची कथा या मालिकेत पाहायला मिळणार आहे. येत्या २३ फेब्रुवारी रोजी प्राइम व्हिडीओ या ओटीटी माध्यमावर ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. हिंदी, मल्याळम व इंग्रजी या तीन भाषांमध्ये ही सीरिज प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा – सुहानी भटनागरच्या मृत्यूबाबत आई-वडिलांचा खुलासा, अभिनेत्रीला झाला होता ‘हा’ दुर्मिळ आजार, म्हणाले, “दुर्दैवाने…”

‘द इंद्राणी मुखर्जी स्टोरी : २०१२ सालच्या शीना बोरा हत्या प्रकरणात इंद्राणी मुखर्जी व तिचा पती पीटर मुखर्जी यांची नावे चर्चेत आली होती. यावर ‘द इंद्राणी मुखर्जी स्टोरी: बरीड ट्रुथ’ ही डॉक्युमेंट्री सीरिज बनवण्यात आली आहे. ‘द इंद्राणी मुखर्जी स्टोरी: बरीड ट्रुथ’ या सीरिजद्वारे कथेच्या दोन्ही बाजूंची अनेक रहस्ये उलगडणार असल्याचे म्हटले जात आहे. येत्या २३ फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे.” असं म्हटलं आहे. ही सीरिज इंग्रजी, हिंदी, तमिळ व तेलुगू अशा चार भाषांत प्रदर्शित होणार आहे.

Tags: Avatar: The Last Airbenderentertainment newsmalaikottai vaalibanott entertainment newsott newspoacherThe Indrani Mukherjea Story Buried Truthअवतार द लास्ट एअरवेंडरओटीटी बातमीद इंद्राणी मुखर्जी स्टोरी बरीड ट्रुथपोचरमनोरंजन बातमीमलाइकोट्टई वालीबान
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Marathi actor Sandeep Pathak reached Udgir to meet his grandmother and video shared on social media

‘आजी सोनियाचा दिनु’ संदीप पाठक आजीला भेटायला पोहोचला उद्गीरमध्ये, सोशल मीडियावर भेटीचा खास व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.