गुरूवार, मे 29, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आयपीएल २०२४मध्ये ‘चेन्नई सुपर किंग्स’ची Brand Ambassador ठरली बॉलिवूडमधील ही सुप्रसिद्ध अभिनेत्री, महेंद्रसिंह धोनीला देणार पाठिंबा  

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 15, 2024 | 6:08 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Bollywood actress katrina kaif Chennai super kings as brand ambassador for ipl 2024

आयपीएल २०२४मध्ये ‘चेन्नई सुपर किंग्स’ची Brand Ambassador ठरली बॉलिवूडमधील ही सुप्रसिद्ध अभिनेत्री, महेंद्रसिंह धोनीला देणार पाठिंबा  

क्रिकेट क्षेत्रातला लोकप्रिय क्रिकेट सामन्यांचा हंगाम म्हणजे आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीग. आयपीएलचे देशभरात लाखों चाहते आहेत. यंदाच्या वर्षी सुरु होणाऱ्या आयपीएलचे वारे आतापासून वाहायला लागले आहेत. अनेकजण आयपीएलच्या सामन्यांसाठी उत्सुक आहेत. या प्रीमियर लीगमध्ये मुंबई, चेन्नई, हैदराबाद, पंजाब, दिल्ली, बँगलोर आदी संघांचा समावेश असतो. त्यातही मुंबई व चेन्नई या दोन संघांचा कायमच दबदबा असतो.

अशातच आयपीएलच्या येत्या हंगामात चेन्नई सुपर किंग्स या संघात काही मोठे बदल होणार असल्याचे म्हटले जात आहे. चेन्नई सुपर किंग्स या संघाचे कर्णधारपद महेंद्रसिंग धोनीकडे आहे. या संघासह महेंद्रसिंग धोनीचेही अनेक चाहते आहेत. चेन्नईच्या संघाला तमिळ चित्रपटसृष्टीतील अनेक मोठे कलाकार पाठिंबा दर्शवताना दिसतात. अशातच आता यात हिंदी चित्रपटसृष्टीतील एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीची भर पडणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफही या संघात सामील होणार असल्याचे म्हटले जात आहे.

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

आणखी वाचा – Video : अंगण, तुळस, नदी अन्…; कोकणातल्या गावी पोहोचले रवी जाधव, संगमेश्वरमध्ये इतकं सुंदर आहे घर, म्हणाले, “गावी गेलं की…”

‘इन्स्टंट बॉलीवूड’च्या वृत्तानुसार, चेन्नई सुपर किंग्सने बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफला आपल्या टीमची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून घोषित केले आहे. यासोबतच कतरिना कैफ आयपीएल २०२४ मध्ये धोनीबरोबर चेन्नई सुपर किंग्स या संघाला पाठिंबा देताना दिसणार आहे. कतरिना कैफ याआधी आयपीएलच्या सामन्यांमध्ये अनेकदा स्टेडियममध्ये दिसली आहे. अभिनेत्री काही सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला पाठिंबा देताना दिसली होती. मात्र, आता कतरिना कैफचे नाव चेन्नई सुपर किंग्स या संघाशी जोडले जात आहे.

आणखी वाचा – महेश मांजरेकरांच्या लेकीने त्यांच्या राहत्या इमारतीमध्येच घेतलं स्वतःचं हक्काचं घर, म्हणाली, “मी व पप्पा…”

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्स हा आयपीएलमधील बलाढ्य संघांपैकी एक आहे.  चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलमध्ये आतापर्यंत ५ वेळा विजेतेपद पटकावले आहेत. अशातच आता २०२४ मध्ये आयपीएलचा १७वा हंगाम होणार आहे.

Tags: bollywood actressBollywood entertainment newsbollywood newschennai super kingsCricket NewsIPL 2024katrina kaifआयपीएल २०२४कतरिना कैफक्रिकेट बातमीचेन्नई सुपर किंग्सबॉलिवूड अभिनेत्रीबॉलिवूड बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bharti Singh Health
Entertainment

भारती सिंहची तब्येत बिघडली, रक्त तपासणी करताना घाबरली अन्…; नेटकरी म्हणाले, “करोना तर…”

मे 29, 2025 | 4:00 pm
Vaishnavi hagawane death case
Social

“संशय होता तर लग्न का केलं?”, वैष्णवी हगवणेवर केलेल्या आरोपांवर कस्पटे कुटुंबियांचा सवाल, पैशांसाठी लग्न करुन…

मे 29, 2025 | 2:05 pm
Girish Pardeshi Video On Fraud Alert
Entertainment

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या पत्नीला ऑनलाइन जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न, हजारो रुपये Gpay वर पाठवले सांगून…; धक्कादायक प्रकार समोर

मे 29, 2025 | 1:30 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Entertainment

वैष्णवीचे परपुरुषाशी संबंध, चॅट अन्…; वकिलांच्या आरोपांवर भडकला मराठी अभिनेता, म्हणाला, “बुरसटलेले, चुकीचे पुरुषी विचार…”

मे 29, 2025 | 12:58 pm
Next Post
Hemangi Kavi Answers To Trollers

"पाठी टांगलेली पँट तरी काढायची", हेमांगी कवीचा डान्स करतानाचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्याची कमेंट, अभिनेत्री म्हणाली, "पुढे लक्ष द्या आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.