मनोरंजन सृष्टीतील आघाडीचे निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते म्हणजे महेश मांजरेकर. महेश मांजरेकर यांना सई, अश्वमी आणि सत्या ही तीन मुलं आहेत. यापैकी सई मांजरेकर हिने वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत मनोरंजन सृष्टीत तिची वेगळी ओळख निर्माण करत आहे. अभिनेता सलमान खानबरोबर ‘दबंग ३’ चित्रपटातून सईने बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली.
एकेकाळी इन्व्हेस्टमेंट बँकर बनण्याचे स्वप्न पाहणारी सई मांजरेकर लहानपणी खूप अभ्यासू होती. त्यामुळे मनोरंजन सृष्टीत ती बऱ्यापैकी तिची वेगळी ओळख निर्माण करू पाहत आहे. सई तिच्या चित्रपटांसह सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चर्चेत राहत असते. अशातच ती तिच्या आगामी ‘कुछ खट्टा हो जाये’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
या चित्रपटाच्या निमित्ताने तिने ‘नवभारत टाईम्स’ला एक मुलाखत दिली. यावेळी सईला “तुला मुलगी असण्याचा सगळ्यात जास्त अभिमान केव्हा वाटला? त्याचबरोबर मुलगी असल्यामुळे तिला कधी हिणवलं गेलं का?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देत सईने असं म्हटलं की, “अलीकडे जेव्हा मी व पप्पा आम्ही एक बिल्डिंगमध्ये घर घेतले. तेव्हा मला खूप अभिमान वाटला. मी ते करू शकले याचा मला आनंद आहे”.
तसेच यापुढे ती असं म्हणाली की, “मला माझ्या आई-वडिलांसाठी खूप काही करायचे आहे. मला एक दिवस आई-वडिलांना म्हणायचे आहे की, आतापर्यंत तुम्ही खूप काम केलं. त्यामुळे तुम्ही आता आराम करा आणि मी त्यांना सगळ्या ती सोईसुविधा देऊ शकते, त्या उंचीवर मला पोहोचायचे आहे.”
दरम्यान, ‘कुछ खट्टा हो जाए’ या चित्रपटात सई गुरु रंधावाबरोबर दिसणार आहे. या चित्रपटाची कथा ही रंजक असल्याचे ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. त्यामुळे सईचे अनेक चाहते तिच्या या आगामी चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहेत.