बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : अंगण, तुळस, नदी अन्…; कोकणातल्या गावी पोहोचले रवी जाधव, संगमेश्वरमध्ये इतकं सुंदर आहे घर, म्हणाले, “गावी गेलं की…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 15, 2024 | 3:45 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ravi Jadhav Home

Video : अंगण, तुळस, नदी अन्…; कोकणातल्या गावी पोहोचले रवी जाधव, संगमेश्वरमध्ये इतकं सुंदर आहे घर, म्हणाले, "गावी गेलं की…"

कलाकार मंडळी नेहमीच त्यांच्या मूळ गावाबद्दलच्या आठवणी चाहत्यांसह शेअर करत असतात. अशातच एका मराठमोळ्या दिग्दर्शकाने त्याच्या मूळ गावच्या शेअर केलेल्या व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सिनेसृष्टीतील बरीच कलाकार मंडळी ही कोकणातील आहेत. ही कलाकार मंडळी त्यांच्या कोकण दौऱ्याचे अनेक फोटो, व्हिडीओ त्यांच्या चाहत्यांसह शेअर करताना दिसतात. अशातच दिग्दर्शक रवी जाधव यांनी सोशल मीडियावरुन त्यांच्या गावचा व्हिडीओ शेअर केला आहे. (Ravi Jadhav Home)

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी त्यांच्या चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. रवी जाधव हे सोशल मीडियावर नेहमीच विविध पोस्ट शेअर करतात. मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय निर्माते-दिग्दर्शक म्हणून रवी जाधव यांना ओळखलं जातं. ‘टाईमपास’, ‘बालक पालक’ ते नुकतीच प्रदर्शित झालेली सुश्मिता सेनची ‘ताली’ वेबसीरिज या त्यांच्या प्रत्येक कलाकृतीचं प्रेक्षकांनी भरभरुन कौतुक केलं. अशातच रवी जाधव यांनी माघी गणेशोत्सवानिमित्त त्यांच्या गावच्या घराचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – हिऱ्यांचा वापर, युनिक डिझाइन अन्…; प्रथमेश परबच्या साखरपुड्याच्या अंगठीची का होतेय चर्चा?, फोटो व्हायरल होताच लोकांची खास पसंती आणि…

View this post on Instagram

A post shared by Ravi Jadhav (@ravijadhavofficial)

“गावी गेलं की मन बेभान होतं आणि गहीवरतही. माघी गणेशोत्सवाला संगमेश्वर तालुक्यातील कासे या माझ्या गावी गेलं की पुन्हा मुंबईला येऊच नये असं वाटतं”, असं कॅप्शन देत त्यांनी त्यांच्या गावच्या घराची झलक दाखवली आहे. शिवाय रवी जाधव यांनी माघी गणेशोत्सवानिमित्त भजन करतानाचे, आरतीचे अनेक फोटो शेअर केले. यावेळी त्यांनी घराबाहेरचा निसर्गरम्य परिसरही दाखवला. अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेलं कौलारू घर खूप खास आहे. घराच्या समोर तुळस असून याने घराची शोभा वाढलेली पाहायला मिळत आहे. शिवाय व्हिडिओमधून त्यांनी नदी, डोंगराची झलक दाखविली आहे.

आणखी वाचा – बायकोवर अगदी जीवापाड प्रेम करतात अविनाश नारकर, शेअर केलेल्या रोमँटिक व्हिडीओची चर्चा, चाहते म्हणाले, “तुमच्या नात्यातील खरेपणा…”

रवी जाधव यांचा ‘मैं अटल हूं’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या चित्रपटात अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली. तसेच काही महिन्यांपूर्वी रवी जाधव यांची ‘ताली’ ही वेब सीरिज रिलीज झाली. या वेबसीरिजचं अनेकांनी कौतुक केलं.

Tags: entertainmentravi jadhavravi jadhav directorravi jadhav homeravi jadhav hometown
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Next Post
Nitish Bharadwaj News

१४ वर्षांचा संसार मोडला, १० वर्षांनी दुसरं लग्न अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्याचे दुसऱ्या पत्नीवर गंभीर आरोप कारण…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.