क्रिकेट क्षेत्रातला लोकप्रिय क्रिकेट सामन्यांचा हंगाम म्हणजे आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीग. आयपीएलचे देशभरात लाखों चाहते आहेत. यंदाच्या वर्षी सुरु होणाऱ्या आयपीएलचे वारे आतापासून वाहायला लागले आहेत. अनेकजण आयपीएलच्या सामन्यांसाठी उत्सुक आहेत. या प्रीमियर लीगमध्ये मुंबई, चेन्नई, हैदराबाद, पंजाब, दिल्ली, बँगलोर आदी संघांचा समावेश असतो. त्यातही मुंबई व चेन्नई या दोन संघांचा कायमच दबदबा असतो.
अशातच आयपीएलच्या येत्या हंगामात चेन्नई सुपर किंग्स या संघात काही मोठे बदल होणार असल्याचे म्हटले जात आहे. चेन्नई सुपर किंग्स या संघाचे कर्णधारपद महेंद्रसिंग धोनीकडे आहे. या संघासह महेंद्रसिंग धोनीचेही अनेक चाहते आहेत. चेन्नईच्या संघाला तमिळ चित्रपटसृष्टीतील अनेक मोठे कलाकार पाठिंबा दर्शवताना दिसतात. अशातच आता यात हिंदी चित्रपटसृष्टीतील एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीची भर पडणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफही या संघात सामील होणार असल्याचे म्हटले जात आहे.
‘इन्स्टंट बॉलीवूड’च्या वृत्तानुसार, चेन्नई सुपर किंग्सने बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफला आपल्या टीमची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून घोषित केले आहे. यासोबतच कतरिना कैफ आयपीएल २०२४ मध्ये धोनीबरोबर चेन्नई सुपर किंग्स या संघाला पाठिंबा देताना दिसणार आहे. कतरिना कैफ याआधी आयपीएलच्या सामन्यांमध्ये अनेकदा स्टेडियममध्ये दिसली आहे. अभिनेत्री काही सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला पाठिंबा देताना दिसली होती. मात्र, आता कतरिना कैफचे नाव चेन्नई सुपर किंग्स या संघाशी जोडले जात आहे.
आणखी वाचा – महेश मांजरेकरांच्या लेकीने त्यांच्या राहत्या इमारतीमध्येच घेतलं स्वतःचं हक्काचं घर, म्हणाली, “मी व पप्पा…”
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्स हा आयपीएलमधील बलाढ्य संघांपैकी एक आहे. चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलमध्ये आतापर्यंत ५ वेळा विजेतेपद पटकावले आहेत. अशातच आता २०२४ मध्ये आयपीएलचा १७वा हंगाम होणार आहे.