शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“गोळ्या झाडायच्या, हल्ला करायचा अन्…”, निखिल वागळे हल्ला प्रकरणी मराठी कलाकारांच्या संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले, “जाहिर निषेध…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 10, 2024 | 5:38 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Nikhil Wagle Case

"गोळ्या झाडायच्या, हल्ला करायचा अन्…", निखिल वागळे हल्ला प्रकरणी मराठी कलाकारांच्या संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले, "जाहिर निषेध…"

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे प्रवास करत असलेल्या गाडीवर काल पुणे येथे हल्ला झाल्याचं समोर आलं. या हल्ल्यातून निखिल वागळे मात्र थोडक्यात बचावले. पुण्यातील दांडेकर पुलानजीक असलेल्या राष्ट्र सेवा दलातील सभागृहात वागळे यांच्या ‘निर्भय बनो’ सभेचे आयोजन कऱण्यात आले होते. त्या सभेला जात असतानाच डेक्कन येथील खंडुजीबाबा चौकात त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. या कार्यक्रमाला जात असताना त्यांच्या गाडीवर भाजपा कार्यकर्त्यांनी हल्ला केला, गाडीच्या काचा फोडून शाईफेक करण्यात आली. या हल्ल्यानंतर विरोधकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. (Nikhil Wagle Case)

सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींनीही या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणावरुन अभिनेत्री विना जामकर व अभिनेते किरण माने यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. किरण माने हे स्पष्टवक्तेपणामुळे ओळखले जातात. अभिनयासह ते नेहमीच बऱ्याच ट्रेंडिंग टॉपिकवर आपलं मत मांडताना दिसतात. अशातच आता निखिल वागळे हल्ला या प्रकरणावरही त्यांनी केलेलं भाष्य सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

आणखी वाचा – “हिला अभिनय जमत नाही”, ‘त्या’ व्यक्तीने तेजश्री प्रधानला हिणावलं, म्हणाला, “पूर्ण कॉपी…”

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री वीणा जामकरने यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. “सन्माननीय निखिल वागळे, चौधरी सर आणि असीम सरोदे यांच्यावरील हल्ल्याचा जाहीर निषेध!!” असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. वीणाच्या या फेसबुक पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिलेल्या पाहायला मिळत आहेत. याशिवाय ‘बिग बॉस’ फेम अभिनेते किरण माने यांनी देखील यासंदर्भात पोस्ट शेअर करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा – Video : दारुचा ग्लास डोक्यावर घेऊन नाचले, सगळेच एकत्र अन्…; ‘बिग बॉस १७’ची जंगी पार्टी, आतमध्ये नक्की काय काय घडलं?

किरण माने यांनीदेखील फेसबुक पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, “सर्व काही लक्षात राहणार, दिवसा तोंडावर गोड गोड गोष्टी करायच्या. ’एव्हरीथिंग इज वेल’ असं सांगायचं आणि रात्र होताच हक्क मागणाऱ्या लोकांवर लाठीचा वापर करायचा, गोळ्या झाडायच्या. आमच्यावर हल्ला करुन, आम्हाला हल्लेखोर भासवून सर्व काही आमच्या लक्षात राहील! निखिल वागळे यांचा खूप अभिमान व प्रेम – किरण माने” असं म्हणत त्याने पोस्ट शेअर केली आहे.

Tags: entertainmentkiran manemarathi actormarathi actressnikhil waglenikhil wagle caseveena jamkar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Next Post
Arbaj shaikh new business

'सैराट' फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याने पुण्यामध्ये सुरु केला स्वतःचा व्यवसाय, व्हिडीओ शेअर करताच चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.