शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘ठरलं तर मग’ मालिकेत पूर्णा आजीचं आजारपणानंतर कमबॅक, लाडकी लेक व अभिनेत्री खास पोस्ट शेअर करत म्हणाली…

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 4, 2024 | 5:19 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
actress jyoti chandekar re enter in the Tharala tar mag serial daughter tejaswini pandit shared post

‘ठरलं तर मग’ मालिकेत पूर्णा आजीचं आजारपणानंतर कमबॅक, लाडकी लेक व अभिनेत्री खास पोस्ट शेअर करत म्हणाली...

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका कायमच अव्वल स्थानावर असते. मालिकेतील अर्जुन व सायली या पात्रांना प्रेक्षकांकडून विशेष प्रेम मिळत आहे. मालिकेत सायली हे पात्र अभिनेत्री जुई गडकरी साकारलं आहे तर अर्जुन हे पात्र अभिनेता अमित भानुशालीने साकारलं आहे. या दोन मुख्य पात्रांसाह पूर्णा आजी हे पात्रदेखील प्रेक्षकांचे आवडते पात्र आहे.

गेले काही दिवस पूर्णा आजी मालिकेत दिसत नसल्यामुळे अनेक प्रेक्षक मंडळी मालिकेत पूर्णा आजीच्या एण्ट्रीची वाट पाहत होते. अशातच मालिकेत पूर्णा आजीची एण्ट्रीही झाली आहे. काही दिवसांपूर्वी मालिकेत पूर्णा आजी देवदर्शनानिमित्त बाहेर गेल्याचं दाखवण्यात येत होतं. पण, प्रत्यक्षात प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी काही दिवस मालिकेतून ब्रेक घेतल्याचं त्यांची मुलगी व लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडितने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे सांगितलं होतं.

आणखी वाचा – अभिनय, निर्मितीनंतर आता ओटीटीवरही झळकणार ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री, हिंदी वेबसीरिजमध्ये साकारणार महत्त्वाची भूमिका

अखेर आजारपणातून ठणठणीत बऱ्या होऊन आता पूर्णा आजी पुन्हा एकदा मालिकेमध्ये परतल्या आहेत. पूर्णा आजीने मालिकेत पुन्हा एण्ट्री घेताच तेजस्विनीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आपल्या आईला शुभेच्छा दिल्या आहेत. “पूर्णा आजीची दमदार रिएन्ट्री, तू लढ!” असं अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे.

आणखी वाचा – पूनम पांडेच्या मृत्यूच्या खोट्या बातमीवर नवरा सॅम बॉम्बेची प्रतिक्रिया, घटस्फोट झाला नसल्याच्याही केला खुलासा, म्हणाला…

दरम्यान, चाहतेदेखील गेल्या काही भागांपासून पूर्णा आजीची आतुरतेने वाट पाहत होते. त्यामुळे मालिकेत पूर्णा आजीच्या पुन्हा येण्याने प्रेक्षकांना भलताच आनंद झाला आहे. तसेच पूर्णा आजीच्या येण्याने आता मालिकेत आणखी नवीन ट्विस्ट येणार याचीही चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

Tags: entertainment newsjyoti chandekarmarathi actressmarathi entertainment newsMarathi newsmarathi serialTharala tar magज्योती चांदेकरठरलं तर मगमनोरंजन बातमीमराठी अभिनेत्रीमराठी बातमीमराठी मनोरंजन बातमीमराठी मालिका
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Next Post
On the occasion of Cancer Day Kranti Redkar did social work with her husband Sameer Wankhede video shared on social media

Video : कॅन्सर रुग्णांसाठी क्रांती रेडकरचं नवऱ्यासह कौतुकास्पद काम, अन्नदानही केलं अन्...; म्हणाली, "दु:ख दूर करण्यासाठी..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.