गायक प्रथमेश लघाटे व गायिका मुग्धा वैशंपायन यांनी त्यांच्या गायनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्धा केले आहे. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स्’ या लोकप्रिय शोमधून यांनी प्रेक्षकांवर राज्य केलं आहे. अशातच या जोडीने नुकताच विवाह करत त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. सारेगमप या शोमुळे त्यांना लोकप्रियता होतीच. मात्र लग्नानंतर या जोडीच्या लोकप्रियतेत आणखीनच भर पडली आहे.
मुग्धा-प्रथमेश सोशल मीडियावरही चांगलेच सक्रिय असतात. सोशल मीडियाद्वारे ते त्यांचे अनेक अपडेट्स चाहत्यांना देत असतात. त्यांच्या गायनाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियाववर ते चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतात आणि त्याच्या या व्हिडीओला चाहत्यांकडूनदेखील चांगलाच प्रतिसाद मिळत असतो. ही दोघे अनेकदा एकत्र गायनाचे कार्यक्रमही करतात.

अशातच दोघांनी त्यांच्या सोशल मीडियावर नुकताच दोघांचा एक फोटो शेअर केला आहे. मुग्धाने इन्स्टाग्राम स्टोरीवर दोघांचा एक सेल्फी फोटो पोस्ट केला असून त्यावर ‘Lets Gau’ असं म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी वडापाव अन् मिसळवरदेखील चांगलाच ताव मारल्याचे पाहायला मिळत आहे. मिसळ व वडापावचा फोटो शेअर करत मुग्धाने “जिभेचे चोचले बाकी काही नाही” असं म्हणत प्रथमेशला टॅग केलं आहे.

दरम्यान, मुग्धा-प्रथमेश आजच्या तरुण पिढीतील लोकप्रिय जोडी आहे. त्यांचे अनेक चाहते मंडळी त्यांच्या गायनाचे चाहते आहेत. दोघे गायनाचे अनेक एकत्र गायनाचे कार्यक्रमदेखील करत असतात. त्यामुळे त्यांची लोकप्रियता अधिकच वाढत चालली आहे.