बुधवार, सप्टेंबर 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“…तर मुस्लीमांच्या आरक्षणासाठीही लढेन”, मनोज जरांगे पाटलांच्या वक्तव्यावर केतकी चितळे संतापली, म्हणाली, “खरं रुप दिसलं आता मुखवटा…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 1, 2024 | 7:20 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Actress Ketaki Chitale expressed her opinion on Manoj Jarange Patil's statement that he will give reservation to Dhangar and Muslim community as well.

"...तर मुस्लीमांच्या आरक्षणासाठीही लढेन", मनोज जरांगे पाटलांच्या वक्तव्यावर केतकी चितळे संतापली, म्हणाली, "खरं रुप दिसलं आता मुखवटा..."

सोशल मीडियावर अनेकदा चिथावणीखोर भाष्य करत कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे केतकी चितळे. केतकी अनेकदा तिच्या वादग्रस्त व्यक्तव्यांमुळे वादाचे कारण बनली आहे. अशातच सध्या महाराष्ट्रभर सुरू असलेल्या मराठा आरक्षणावरुनही ती चर्चेत आली आहे. महानगरपालिकेचे कर्मचारी मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी गेले असताना केतकीने त्यांच्याशी हुज्जत घातली. तसेच आरक्षणाबाबत काही वादग्रस्त वक्तव्येही केली. सोशल मीडियावर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते.

यावेळी केतकीने महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्याला जाब विचारला होता. अभिनेत्रीने स्वत: मोबाइलमध्ये हा व्हिडीओ काढत “तुम्ही मराठा म्हणजे माझ्यावर अ‍ॅट्रॉसिटी टाकणार नाहीत. मी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण आहे. संविधान आणि कायदा सर्वांसाठी समान नाही. जातींवर आधारित कायदे बनवले जात आहेत.” असे म्हटली होती. यावरून तिच्यावर अनेक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या. अशातच तिने नुकतेच मनोज जरांगे पाटील यांच्या एका वक्तव्यावर पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – लग्नानंतर असं आयुष्य जगत आहेत मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटे, मिसळ-वड्यांवर मारला ताव, म्हणाली, “जीभेचे चोचले…”

मराठा समाजाच्या मागण्या मान्य होताच मनोज जरांगे पाटील यांनी “धनगर आणि मुस्लीम बांधवांनी मागणी केल्यास त्यांच्याही आरक्षणासाठी मी लढा देईल.” असं म्हटलं होतं. मनोज जरांगे पाटलांचे हे वक्तव्य केतकीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे आणि त्यावर “आता कसे, खरे रूप दिसले. मुखवटा फार काळ टिकत नाही. यांना सनातनींमध्ये फूट पाडायची आहे. आता तरी जागे व्हा.” असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – Video : “हा घाणेरडापणा…”, शोमध्ये डान्स करत पाठ व कंबरेवर नोरा फतेहीने ओतलं पाणी, ‘ते’ कृत्य पाहून प्रेक्षक भडकले, म्हणाले, “आदर गमावला अन्…”

तसेच या पोस्टखाली तिने ‘Uniform Criminal Law’ असंही म्हटलं आहे. दरम्यान, केतकीची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत असून तिच्या या नवीन वक्तव्याने पुन्हा नवीन वाद उभा राहणार का? असा प्रश्न पडला आहे.  

Tags: मनोज जरांगे पाटीलमराठी अभिनेत्रीमराठी मनोरंजनमराठी बातमीकेतकी चितळेentertainment newsketaki chitalemanoj jarange patilmarathi actressmarathi entertainmentMarathi news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरजच्या बाळाला भेटायला गेली, हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली अन्…; जान्हवीच्या ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

सप्टेंबर 8, 2026 | 12:19 pm
Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Next Post
Shivani Surve and Ajinkya Nanaware Wedding Updates in Marathi

Shivani Surve and Ajinkya Nanaware Wedding : लग्नासाठी अवाढव्य खर्च पण शिवानी सुर्वेच्या साध्या लूकने वेधलं लक्ष, लाल रंगाचा लेहंगाही परिधान करणं टाळलं, पाहा काही खास फोटो

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.