Ajinkya Nanaware And Actress Shivani Surve Engagement : अभिनेता अजिंक्य ननावरे व अभिनेत्री शिवानी सुर्वे यांचा नुकताच साखरपुडा सोहळा संपन्न झाला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती आणि अखेर या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे. अजिंक्य-शिवानी यांच्या साखरपुड्याचे काही खास क्षण सोशल मीडियावरशेयर करण्यात आले आहेत. ‘अखेर बंधनात’ असं कॅप्शन लिहित अभिनेत्री शिवानी सुर्वेने साखरपुड्याची पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने साखरपुड्यातील खास क्षणांचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये शिवानी व अजिंक्य हटके लूकमध्ये पाहायला मिळत आहे.
शिवानी-अजिंक्य यांनी काल (३१ जानेवारी) रोजी साखरपुडा उरकल्यानंतर आज ही जोडी विवाहबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे आणि यासाठी खास मंडपही सजला आहे. अजिंक्य-शिवानी यांचे लग्न निसर्गरम्य ठिकाणी पार पडणार आहे. त्यांच्या लग्नासाठी खास डेकोरेशनही करण्यात आले आहे. निसर्गाच्या सानिध्यात गर्द छायेत हा लग्नसोहळा पार पडणार आहे. ठाण्यातील येउर हिल्स या ठिकाणी शिवानी-अजिंक्यचा विवाहसोहळा पर पडणार आहे. याचे काही खास फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
आणखी वाचा – एकत्र काम करण्याबाबत निवेदिता सराफ यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “आम्हा दोघांना…”
शिवानी-अजिंक्यचा साखरपुडा पार पडल्यानंतर रात्री या दोघांचा हळदी समारंभदेखील पार पडला आहे आणि त्यांच्या या हळदी सोहळ्याला मराठीतील अनेक कलाकार मंडळींनी उपस्थिती लावली होती. शिवानीने ‘बिग बॉस मराठी’मध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे ‘बिग बॉस’मधील माधव देवचक्के, नेहा चितळे, मेघा धाडे आणि अनेक इतर कलाकार मंडळी या हळदी समारंभात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी हळदीमध्ये खास डान्सही केला आणि त्यांच्याबरोबर नवरीनेदेखिळो ताल धरला असल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, शिवानी-अजिंक्य ही दोघे आज दुपारी विवाहबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे. गेले अनेक दिवस त्यांच्या चाहत्यांना दोघांच्या लग्नाची उत्सुकता लागली होती आणि अखेर आता ही जोडी विवाहबंधनात अडकणार असल्यामुळे चाहते कमालीचे उत्सुक आहेत.