बरेच असे कलाकार असतात जे त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे चर्चेत येतात. तर कधी ते न पटणाऱ्या मुद्द्यांवर सडेतोड भाष्य केल्याने व पोस्ट शेअर केल्याने चर्चेत येतात. दरम्यान अशा प्रकारच्या पोस्ट केल्याने ते नेत्र्यांच्या तावडीत देखील सापडतात. काही दिवसांपूर्वीच मराठा आरक्षणावरुन बऱ्याच कलाकारांनी या गोष्टीला पाठिंबा दर्शवला. तर काहींनी विरोध करत आक्षेपार्ह पोस्ट देखील शेअर केल्या. मराठा आरक्षणा दरम्यान करण्यात येणाऱ्या सर्वे प्रकरणावरून अभिनेत्री केतकी चितळे हिने केलेली पोस्ट लक्षवेधी ठरली. (Pushkar Jog Post)
यानंतर आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याने या संदर्भात केलेल्या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून ‘बिग बॉस’ मराठी फेम पुष्कर जोग आहे. याआधीही पुष्करने बरेचदा न पटणाऱ्या व विविध अंगी विषयावर भाष्य करत त्याचं मत मांडलं. सोशल मीडियावर पुष्करचा बऱ्यापैकी वावर असलेला पाहायला मिळतो. सोशल मीडियाद्वारे तो नेहमीच काही ना काही ना काही पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहतो.

दरम्यान त्याने केलेल्या पोस्टवरुन अनेकदा त्याला ट्रोलिंगचा सामनाही करावा लागलेला आहे. मात्र या ट्रोलर्सला न घाबरता तो सिनेइंडस्ट्रीतील वा सामाजिक विविध मुद्द्यांवर भाष्य करत असतो. अशातच अभिनेत्याने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या एका स्टोरीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. बीएमसी कर्मचारी व सर्वे प्रकरणावरुन त्याने स्टोरी पोस्ट केलेली पाहायला मिळत आहे.
त्याने राग व्यक्त करत स्टोरीमध्ये लिहिलं आहे की, “काल बीएमसीचे काही कर्मचारी माझ्या घरी आले आणि मला सर्व्हे करतोय अशी माहिती देऊन माझी जात विचारत होते. त्या कर्मचारी जर बाईमाणूस नसत्या, तर २ लाथा नक्कीच मारल्या असत्या…कृपया करुन मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका नाहीतर जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली मारतील. #जोगबोलणार” अभिनेत्याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.