बुधवार, सप्टेंबर 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“२ लाथा मारल्या असत्या…”, BMC च्या कर्मचाऱ्यांनी जातीवरुन चौकशी करताच पुष्कर जोग भडकला, म्हणाला, “डायरेक्ट कानाखाली…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 28, 2024 | 5:06 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Pushkar Jog Post

"२ लाथा मारल्या असत्या…", BMC च्या कर्मचाऱ्यांनी जातीवरुन चौकशी करताच पुष्कर जोग भडकला, म्हणाला, "डायरेक्ट कानाखाली…"

बरेच असे कलाकार असतात जे त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे चर्चेत येतात. तर कधी ते न पटणाऱ्या मुद्द्यांवर सडेतोड भाष्य केल्याने व पोस्ट शेअर केल्याने चर्चेत येतात. दरम्यान अशा प्रकारच्या पोस्ट केल्याने ते नेत्र्यांच्या तावडीत देखील सापडतात. काही दिवसांपूर्वीच मराठा आरक्षणावरुन बऱ्याच कलाकारांनी या गोष्टीला पाठिंबा दर्शवला. तर काहींनी विरोध करत आक्षेपार्ह पोस्ट देखील शेअर केल्या. मराठा आरक्षणा दरम्यान करण्यात येणाऱ्या सर्वे प्रकरणावरून अभिनेत्री केतकी चितळे हिने केलेली पोस्ट लक्षवेधी ठरली. (Pushkar Jog Post)

यानंतर आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याने या संदर्भात केलेल्या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून ‘बिग बॉस’ मराठी फेम पुष्कर जोग आहे. याआधीही पुष्करने बरेचदा न पटणाऱ्या व विविध अंगी विषयावर भाष्य करत त्याचं मत मांडलं. सोशल मीडियावर पुष्करचा बऱ्यापैकी वावर असलेला पाहायला मिळतो. सोशल मीडियाद्वारे तो नेहमीच काही ना काही ना काही पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहतो.

आणखी वाचा – संकर्षण कऱ्हाडेने केलं शरद पोंक्षेंच्या नाटकाबाबतच्या निर्णयाचं कौतुक, म्हणाला, “…हे जास्त अवघड आहे”

दरम्यान त्याने केलेल्या पोस्टवरुन अनेकदा त्याला ट्रोलिंगचा सामनाही करावा लागलेला आहे. मात्र या ट्रोलर्सला न घाबरता तो सिनेइंडस्ट्रीतील वा सामाजिक विविध मुद्द्यांवर भाष्य करत असतो. अशातच अभिनेत्याने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या एका स्टोरीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. बीएमसी कर्मचारी व सर्वे प्रकरणावरुन त्याने स्टोरी पोस्ट केलेली पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – ‘आधी मारहाण, मग माफी’, प्रसिद्ध गायक राहत फतेह अली खान यांच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांचा संताप

त्याने राग व्यक्त करत स्टोरीमध्ये लिहिलं आहे की, “काल बीएमसीचे काही कर्मचारी माझ्या घरी आले आणि मला सर्व्हे करतोय अशी माहिती देऊन माझी जात विचारत होते. त्या कर्मचारी जर बाईमाणूस नसत्या, तर २ लाथा नक्कीच मारल्या असत्या…कृपया करुन मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका नाहीतर जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली मारतील. #जोगबोलणार” अभिनेत्याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

Tags: entertainmentpushkar jogpushkar jog instagrapushkar jog on bmcpushkar jog post
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Ayesha Khan Bigg Boss Contestant

"९ वर्षाच्या मुलीला…", आयेशा खानसह झाला होता विनयभंगाचा प्रकार, धक्कादायक प्रसंग सांगत स्वतःच केला खुलासा, म्हणाली, "जिन्यावरून ढकललं अन्…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.