Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’चा महाअंतिम सोहळा आज धुमधडाक्यात पार पडणार आहे. ‘बिग बॉस’ची ही ट्रॉफी कोणता स्पर्धक पटकावणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. मुन्नवर फारुकी, अंकिता लोखंडे, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार, अरुण माशेट्टी हे पाच स्पर्धेत ‘बिग बॉस’च्या फिनालेसाठी सज्ज झाले आहेत. या पाच स्पर्धकांनी त्यांच्या खेळाने व चाहत्यांच्या प्रेमाने इथवरचा प्रवास पूर्ण केला आहे. सोशल मीडियावर ‘बिग बॉस १७’ च्या आजच्या या फिनालेची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ पोस्ट शेअर करत चाहत्यांनी व इतर कलाकार मंडळींनी स्पर्धकांच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केल्या आहेत.
अनेक कलाकारांनी यंदाच्या ‘बिग बॉस’च्या फिनालेमधील स्पर्धकांना पाठिंबा दर्शवलेला पाहायला मिळत आहे. या दरम्यान मराठमोळ्या शिव ठाकरेनेही ‘बिग बॉस’च्या घरातील एका स्पर्धकाला पाठिंबा दर्शवला असल्याचं समोर आलं आहे. शिव ठाकरे हा ‘बिग बॉस’ मराठीचा विजेता होता. ‘बिग बॉस’ मराठी मुळे शिव ठाकरेला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्याचा सिनेसृष्टीतील प्रवास हा उत्तम सुरु आहे. ‘बिग बॉस १७’ मधील एका स्पर्धकाला पाठिंबा दर्शवणारी पोस्ट शिवने सोशल मीडियावरुन शेअर केली आहे. हा स्पर्धक दुसरा तिसरा कोणी नसून अरुण माशेट्टी आहे.

सोशल मीडियावर सर्वत्र अंकिता लोखंडे, मुन्नवर फारुकी या स्पर्धकांना विजेतेपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र ‘बिग बॉस’ विजेता शिव ठाकरे याने अरुण माशेट्टीला पाठिंबा दर्शवला आहे. अरुणच्या कामाचं कौतुक केल्याने यावरुन शिवला अरुण माशेट्टी खरा विजेता असल्याचे वाटतंय हे सिद्ध होत आहे.
शिवने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट शेअर करत, “लव्ह यु ब्रदर, दिलवाला बंदा” असं म्हणत अरुण माशेट्टीचा फोटो पोस्ट केला आहे. अद्याप ‘बिग बॉस १७’चा विजेता प्रेक्षकांसमोर आलेला नाही त्यामुळे ट्रॉफी नेमकी कोणता स्पर्धक पटकावणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.