एखाद्या कलाकाराचे खासगी आयुष्य जाणून घेण्यात चाहत्यांना वा प्रेक्षकांना नेहमीच आवडतं. आपल्या आवडत्या कलाकाराच्या आयुष्यात काय चाललं आहे? त्याला काय आवडतं? त्याला काय पसंत पडतं? तो रोजच्या आयुष्यात काय करतो? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडलेले असतात. त्यात आवडत्या कलाकाराच्या आयुष्यातील प्रेम किंवा लग्न याविषयी चाहत्यांना जाणून घेण्यात कायमच रस असतो आणि यासाठी अनेक चाहतेमंडळी आपल्या आवडत्या कलाकाराला सोशल मीडियावर लपून छपून नजरही ठेवत असतात. त्यात चाहत्यांना आवडणारा कलाकार हा तरुण असेल तर त्याचे अनेक चाहते त्याच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यात अधिकच उत्सुक असतात
आजच्या तरुण पिढीतील काही नवख्या कलाकारांपैकी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधील अभिनेता पृथ्वीक प्रताप व ओंकार राऊत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील काही कलाकारांप्रमाणे हे दोघे सध्या तरुण पिढीच्या गळ्यातील ताईत झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी जाणून घेण्यात त्यांच्या चाहत्यांना खूपच रस असतो. अशातच पृथ्वीक प्रतापने त्याच्या खासगी आयुष्याविषयी भाष्य केले आहे.
हेही वाचा – राहुल वैद्य व दिशा परमार यांचा ‘या’ स्पर्धकाला पाठिंबा, फिनालेआधीच सांगितलं विजेत्याचं नाव, म्हणाले…
नुकताच ‘बीएससी अॅग्री’ या चित्रपटाचा प्रीमियर पार पडला. यावेळी ‘इट्स मज्जा’शी गप्पा मारताना पृथ्वीकला त्याला “त्याच्या आयुष्यातील भावी पत्नी कशी हवी आहे?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी उत्तर देत पृथ्वीकने असे म्हटले की, “माझ्या मुलीसाठी कोणत्याच अटी किंवा नियम नाहीत. पण मुलगी छान, मनमिळावू व सुंदर हवी. तिच्याशी काहीही बोलता येता यावं. तिच्याकडे मन मोकळं करता यावं. बस्स, बाकी माझ्या काही मागण्या नाहीत”.
यासह ओंकार राऊतनेदेखील त्याच्या भावी आयुष्यातील मुलीविषयीच्या अपेक्षा सांगत असे म्हटले की, “मला समजून घेणारी, हुशार व स्वत:च्या पायावर सक्षम असलेली मुलगी हवी आहे. मला नेमकं माहीत नाही किंवा मी काही ठरवलेलं नाही. पण जेव्हा मी तिच्याकडे बघेन तेव्हा कदाचित मला कळेल की हीच आहे ती”.
हेही वाचा – प्रथमेशने मुग्धाच्या बहिणीला दिलं खास सरप्राइज, मेहुणीबरोबरचा फोटो शेअर करत म्हणाला…
दरम्यान, ‘बीएससी अॅग्री’ या चित्रपटात अभिनेता क्षितीश दाते व अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यामुळे हास्यजत्रा या शोमधील सहकलाकार प्रियदर्शिनीला चित्रपटासाठी शुभेच्छा देण्यासाठी ओंकार-पृथ्वीक यांनी चित्रपटाच्या प्रीमियरला खास हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी या चित्रपटाला व चित्रपटाच्या संपूर्ण टीमलादेखील शुभेच्छा देत त्यांचे कौतुकही केले.