शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : “तिच्या आयुष्याचा प्रवास…”, अंकिता लोखंडेला पाठिंबा देत ‘या’ मराठी अभिनेत्रीची भावनिक साद, म्हणाली, “खरेपणामुळे…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 27, 2024 | 4:12 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Bigg Boss 17 Marathi actress Priya Marathe shared a special video to support Ankita Lokhande

Bigg Boss 17 : “तिच्या आयुष्याचा प्रवास...”, अंकिता लोखंडेला पाठिंबा देत ‘या’ मराठी अभिनेत्रीची भावनिक साद, म्हणाली, “खरेपणामुळे..."

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त व बहूचर्चित शो म्हणजे ‘बिग बॉस’. ‘बिग बॉस’च्या दरवर्षीच्या अनेक पर्वांप्रमाणे यंदाच्या १७वे पर्वदेखील विसहश गाजले. अशातच बिग बॉसच्या यंदाच्या १७व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. ‘बिग बॉस’चे यंदाचे पर्व हे अनेक कारणांनी गाजले.  ‘बिग बॉस’चे यंदाचे पर्व हे मनोरंजन विश्वातील जोड्यांवर आधारित होतं. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या यंदाच्या १७व्या पर्वात अनेक जोडप्यांनी सहभाग घेतला होता. ५त्यामुळे या जोडप्यांमधील रोजच्या भांडणांचादेखील प्रेक्षकांनी अगदी मनमुराद आनंद घेतला. 

अशातच ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा उद्या पार पडणार आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या स्पर्धकाला जिंकण्यासाठी घरातील प्रत्येक स्पर्धकाचा चाहता व प्रेक्षक सोशल मीडियाद्वारे पाठिंबा देत असल्याचे पाहायला मिळत आहे. यात सामान्य प्रेक्षकांसह मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळीदेखील त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला जिंकवण्यासाठी समर्थन देत आहेत. त्यांचा आवडता स्पर्धक जिंकावा यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Priya Marathe (@priyamarathe)

आणखी वाचा – Video : क्रांती रेडकरच्या मुलीने बाहुलीला घातली आंघोळ, करामत पाहून वडील ओरडले, पण नेटकऱ्यांना दिसली भलतीच गोष्ट, म्हणाले, “तुमच्या गॅलरीमध्ये…”

अंकिता लोखंडे ही या घरात आल्यापासूनच मुख्य आकर्षण बनली आहे. घरात आल्याच्या पहिल्या दिवसापासूनच ही अभिनेत्री विविध कारणांनी चर्चेत आहे. अंकिताची या शोमध्ये येण्याआधीच ती ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे घराघरांत पोहोचली होती. या मालिकेमुळे तिला अमाप लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती. त्यांतर या शोमुळेदेखील तिला अमाप लोकप्रियता व प्रसिद्धी मिळाली आहे. त्यामुळे तिची लोकप्रियता व प्रसिद्धी पाहता तिला अनेक स्तरातून तिला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. अशातच मराठमोळी अभिनेत्री प्रिया मराठेने देखील अंकिता लोखंडेल पाठींबा देणारी एक पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – प्रथमेशने मुग्धाच्या बहिणीला दिलं खास सरप्राइज, मेहुणीबरोबरचा फोटो शेअर करत म्हणाला…

प्रियाने तिच्या सोशल मीडियाद्वारे एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यात तिने असं म्हटलं आहे की, “मी अंकिताला खूप वर्षांपासून ओळखत आहे. मी तिच्या आयुष्याचा प्रवास आणि तिचा संघर्ष फार जवळून पाहिला आहे आणि ती एक संघर्षयोद्धा आहे, यावर माझा विश्वास आहे. तुम्ही सर्वांनीदेखील तिचा ‘बिग बॉस’च्या घरात जाण्यापर्यंत त्याचबरोबर ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवासही पाहिला आहे. तिच्या या आवडीमुळे व खरेपणामुळे ती इथपर्यंत येऊन पोहोचली आहे.” यापुढे प्रिया असं म्हणाली की, “आज मी तिचे शुभचिंतक, चाहते व प्रेक्षक यांना विनंती करते की, तुमचे तिच्यावरील प्रेम हे मतांद्वारे व्यक्त करा. तिला आता तुमच्या पाठिंब्याची अधिक गरज आहे. त्यामुळे कृपया अंकिताला भरघोस मतं द्या.”

दरम्यन, अंकिताला रश्मी देसाई, राखी सावंत, कंगना रानौत, सनी लिओनी या बॉलिवूड अभिनेत्रींसह अमृता खानविलकर, अभिज्ञा भावे, प्रार्थना बेहेरे आणि आता प्रिया मराठे या मराठी अभिनेत्रीनेही अंकिताला पाठिंबा दिला आहे    

Tags: ankita lokhandebigg bossbigg boss 17bigg boss 17 newsentertainment newsmarathi actresspriya maratheअंकिता लोखंडेप्रिया मराठेबिग बॉसबिग बॉस १७बिग बॉस १७ बातमीमराठी अभिनेत्री
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Hina Khan Wedding
Entertainment

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर परतली हिना खान, अगदी सिंपल लूकमध्ये दिसली, एकटी दिसताच नेटकरी म्हणाले, “नवरदेव कुठे आहे?”

जून 6, 2025 | 10:30 am
javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Next Post
Bigg Boss 17 Latest News

Bigg Boss 17 :विकी जैन शोमधून बाहेर पडताच अंकिता लोखंडेचा धक्कादायक खुलासा, नवऱ्याला खोटं ठरवलं अन्…, म्हणाली, "तो नसता तर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.