शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘शिवरायांचा छावा’चा टीझर पाहून प्रेक्षकांना आली अमोल कोल्हेंची आठवण, कमेंट करत म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेची निवड चुकली अन्…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 24, 2024 | 1:33 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Shivrayancha chhava movie teaser 2 released bhushan patil play chhatrapati sambhaji maharaj role see the details

'शिवरायांचा छावा'चा टीझर पाहून प्रेक्षकांना आली अमोल कोल्हेंची आठवण, कमेंट करत म्हणाले, "छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेची निवड चुकली अन्..."

गेल्या अनेक दिवसांपासून शिवरायांचा छावा या चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरु आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित शिवरायांचा छावा या चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित झाल्यापासूनच अनेक चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. पोस्टर, ट्रेलर पाहून अनेकजण या चित्रपटासाठी आतुर असल्याचे पाहायला मिळाले होते. अशातच नुकताच या चित्रपटाचा आणखी एक नवीन टीझर चाहत्यांच्या भेटीला आला आहे.

दिग्पाल लांजेकर यांनी चित्रपटाच्या दुसऱ्या टीझरचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता चिन्मय मांडलेकर दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे संभाजी महाराज यांना रयतेच्या  रक्षणाची जबाबदारी देत असताना ते त्या जबाबदारीचे महत्त्व समजावताना दिसत आहेत. तर याचवेळी अभिनेता भूषण पाटील छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत सिंहासनावर विराजमान होताना पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Everest Entertainment Marathi (@everestentertainment)

आणखी वाचा – चित्रपटगृहे गाजवल्यानंतर आता ओटीटीवर प्रदर्शनासाठी ‘सॅम बहादूर’ सज्ज, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर व भूषण पाटील यांनी या चित्रपटाचा दुसरा टीझर शेअर करत कॅप्शनमध्ये, “जयांच्या ध्वनीने उसळती सह्याद्री आणि समुद्र रायगडी बैसले सिंहासनी गर्जती रुद्र.” असं म्हणत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे. नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेते अमोल कोल्हेच शोभून दिसतात किंवा या चित्रपटासाठी विशाल निकमची निवड करायला हवी होती अशा आशयाच्या कमेंट्स आल्या आहेत.

आणखी वाचा – Bigg Boss 17 : “तू खूप…”, ‘बिग बॉस मराठी’ विजेता सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची अंकिता लोखंडेच्या नवऱ्यासाठी पोस्ट, म्हणाला, “माझा…”

दरम्यान, ए. ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट प्रस्तुत ‘शिवरायांचा छावा’ हा चित्रपट येत्या १६ फेब्रुवारी २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मल्हार पिक्चर्स कंपनीचे वैभव भोर, किशोर पाटकर व मधू यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सहनिर्माते भावेश रजनीकांत पंचमतीया हे आहेत. संभाजी महाराजांच्या धगधगत्या पराक्रमाची कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून पटकथा-संवाद व गाणीदेखील त्यांचीच आहेत. तसेच या गाण्यांना साजेसं संगीत संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिलं आहे आणि पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे.   

Tags: amol kolheBhushan Patilentertainment newsmarathi actorsmarathi entertainment newsmarathi moviesMarathi newsShivrayancha Chavaअमोल कोल्हेभूषण पाटीलमराठी अभिनेतामराठी चित्रपटमराठी बातमीमराठी मनोरंजन बातमीशिवरायांचा छावा
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss 17 Latest News

Bigg Boss 17 : 'बिग बॉस'च्या घरात तीन ते चार दिवस आंघोळच करायचा नाही अंकिता लोखंडेचा नवरा, स्पर्धकाचा मोठा खुलासा, म्हणाला, "तेच कपडे तो…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.