शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुझं मन…”, अंकिता लोखंडेला सुशांत सिंग राजपूतच्या बहिणीचा पाठिंबा, अभिनेत्रीची सासू पुन्हा भडकणार का?, म्हणाली, “अतिशय शुद्ध…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 16, 2024 | 3:52 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss 17 Latest New

"तुझं मन…", अंकिता लोखंडेला सुशांत सिंग राजपूतच्या बहिणीचा पाठिंबा, अभिनेत्रीची सासू पुन्हा भडकणार का?, म्हणाली, "अतिशय शुद्ध…"

Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’मध्ये अंकिता लोखंडेचा प्रवास पाहिल्यादिवसापासून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. अभिनेत्रीने तिच्या पतीसह ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला. ‘बिग बॉस’च्या घरात अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच काही ना काही घडतं, ज्याची सर्वत्र चर्चाही रंगते. गेल्या काही दिवसांपासून अंकिता व विकी जैन यांच्यात वाद सुरु होता. यामुळे ती बरीच खचलेली पाहायला मिळाली. ‘बिग बॉस’च्या घरात आल्यानंतर अंकिताने बरेचदा सुशांतची आठवण आली. त्यांच्याशी संबंधित गोष्टी सांगताना ती भावूकही झालेली पाहायला मिळाली. या सगळ्यात अंकिताला सुशांतची बहीण श्वेता व मित्र अली गोनी यांनी पाठिंबा दर्शविला आहे.

खरं तर, अंकिता लोखंडे विकी जैनबद्दल खूप सकारात्मक आहे.याबाबत तिने बरेचदा भाष्यही केलं आहे. विकी जैन तिला वेळ देत नाही या मुद्द्यावरुन तिचं भांडणही झालं आहे. अंकिताच्या सासूबाईंनीही ‘बिग बॉस’च्या घरात व घराबाहेर आल्यानंतर अनेक मुलाखतींद्वारे बरीच विधानं केली आहेत. मात्र सुशांत सिंहची बहीण श्वेता सिंह हिने अंकिताला सपोर्ट केलेला पाहायला मिळाला.

आणखी वाचा – “मी झोपलेला…”, आयेशा खानला पाहून विकी जैनचं अश्लील बोलणं, अंकिता लोखंडे भडकली, म्हणाली, “तुला फक्त…”

सुशांत सिंह राजपूतची बहीण श्वेता सिंहने यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने अंकिताबरोबरचा एक कोलाज व्हिडीओ शेअर केला आहे. याबरोबर तिने लिहिले आहे की, ‘लव्ह यू अंकी. तू सर्वोत्कृष्ट व अतिशय शुद्ध मनाची व्यक्ती आहेस”. अंकिता सुशांत सिंहचा वापर करत आहे, वोट मिळण्यासाठी ती त्याची आठवण काढत आहे अशा बऱ्याच कमेंट प्रेक्षकांनी केलेल्या पाहायला मिळाल्या. सुशांत सिंहच्या पाठोपाठ अली गोनीनेही अभिनेत्रीला आपला पाठिंबा दर्शवला आहे.

आणखी वाचा – Video : ‘रामायण’मधील राम अयोध्यामध्ये दाखल, विमानतळावर पोहोचताच लोक पाया पडू लागले अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल

अली गोनीने विकी, अंकिता व जास्मिन भसीनबरोबरचा एक ग्रुप फोटो शेअर करत लिहिले आहे की, “टीव्हीवर काय दाखवले जात आहे हे मला माहीत नाही, पण हे दोघे मला भेटलेले सर्वात चांगलं जोडपं आहे. तुम्हा दोघांना अजून बळ मिळो” असं म्हणत त्याने अंकिता व विकीला पाठिंबा दर्शविला आहे.

Tags: aly goniankita lokhandebigg boss 17entertainmentsushant singh rajputsushant singh rajput sister
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
actor Prasad Jawade and actress Amruta Deshmukh makarsankrant special ukhana video viral on social media

"आमचा जलवा…", पहिल्या मकरसंक्रांतीसाठी अमृता-प्रसादचा एकमेकांसाठी लाजत खास उखाणा, अभिनेत्री म्हणाली, "साम्राज्याच्या…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.