Nupur Shikhare and Ira Khan Marriage : आयरा खान व नुपूर शिखरे यांच्या भव्य रिसेप्शन सोहळ्याची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. आयरा व नुपूर यांच्या भव्य रिसेप्शन सोहळ्याचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालताना दिसत आहेत. आमिर खानच्या लेकीच्या या भव्य रिसेप्शन सोहळ्याचे आयोजन मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे करण्यात आले होते. दरम्यान उपस्थित असलेल्या सेलिब्रिटी कलाकारांनी व सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार मंडळींनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली.
आयरा व नुपूर यांनी नोंदणी पद्धतीने त्यांचा विवाह सोहळा उरकला. त्यानंतर शाही थाटामाटात त्यांचा लग्न सोहळा उरकण्यासाठी ही जोडी उदयपूर येथे रवाना झाली. उदयपूर येथील ताज पॅलेस येथे आयरा व नुपूर यांचा मेहंदी, संगीत व शाही लग्नसोहळा पार पडला. यानंतर आता त्यांचा भव्य रिसेप्शन सोहळा नुकताच संपन्न झाला आहे. या रिसेप्शन सोहळ्याची आकर्षणाची बाब म्हणजे सेलिब्रिटी कलाकार. बॉलिवूड, दाक्षिणात्य कलाकारांना या खास सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं होतं.
बॉलीवूड व दाक्षिणात्य कलाकारांच्या मांदियाळीत मराठमोळी लाडकी जोडी आर्ची व परश्या म्हणजेच आकाश ठोसर व रिंकू राजगुरू यांनी लक्ष वेधून घेतलं आहे. या रिसेप्शन पार्टीला आकाश व रिंकू यांनीदेखील हजेरी लावली. त्यांचा एकत्र येतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आकाशने काळ्या रंगाची शेरवानी घातली होती. तर गुलाबी काठपदरच्या निळ्या साडीत रिंकू राजगुरू कमालीची सुंदर दिसत होती. दोघांच्या साधेपणाचंही सर्वत्र कौतुक होतं होतं.
आमिर खानच्या लेकीच्या लग्नात रिंकू व आकाश यांनी एकत्र पोज देत फोटो काढले. दरम्यान या ग्रँड रिसेप्शन सोहळ्यातील रिंकूच्या महाराष्ट्रीयन लूककडे साऱ्यांच्या नजरा वळल्या. आयरा व नुपूर यांच्या दोन पद्धतीच्या लग्नानंतर शनिवारी मुंबईत भव्य रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला. या रिसेप्शन सोहळ्यात संपूर्ण बॉलीवूड अवतरलं होतं. या सोहळ्याचे फोटो व व्हिडीओ व्हायरल होत आहेत.