शनिवार, जून 13, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Ira Khan-Nupur Shikhare Wedding : आयरा-नुपूरच्या रिसेप्शन पार्टीमध्ये मराठमोळ्या जोडीची हवा, रिंकू राजगुरू व आकाश ठोसर एकत्र पोहोचले अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 14, 2024 | 11:06 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Nupur Shikhare and Ira Khan Wedding Marathi News

आयरा खान-नुपूर शिखरे लग्न

Nupur Shikhare and Ira Khan Marriage : आयरा खान व नुपूर शिखरे यांच्या भव्य रिसेप्शन सोहळ्याची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. आयरा व नुपूर यांच्या भव्य रिसेप्शन सोहळ्याचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालताना दिसत आहेत. आमिर खानच्या लेकीच्या या भव्य रिसेप्शन सोहळ्याचे आयोजन मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे करण्यात आले होते. दरम्यान उपस्थित असलेल्या सेलिब्रिटी कलाकारांनी व सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार मंडळींनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली.

आयरा व नुपूर यांनी नोंदणी पद्धतीने त्यांचा विवाह सोहळा उरकला. त्यानंतर शाही थाटामाटात त्यांचा लग्न सोहळा उरकण्यासाठी ही जोडी उदयपूर येथे रवाना झाली. उदयपूर येथील ताज पॅलेस येथे आयरा व नुपूर यांचा मेहंदी, संगीत व शाही लग्नसोहळा पार पडला. यानंतर आता त्यांचा भव्य रिसेप्शन सोहळा नुकताच संपन्न झाला आहे. या रिसेप्शन सोहळ्याची आकर्षणाची बाब म्हणजे सेलिब्रिटी कलाकार. बॉलिवूड, दाक्षिणात्य कलाकारांना या खास सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं होतं.

आणखी वाचा – आयरा-नुपूरचा शाही रिसेप्शन सोहळा संपन्न, नवं जोडप्याच्या खास लूकची होतेय चर्चा, फोटो-व्हिडीओ तुफान व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

बॉलीवूड व दाक्षिणात्य कलाकारांच्या मांदियाळीत मराठमोळी लाडकी जोडी आर्ची व परश्या म्हणजेच आकाश ठोसर व रिंकू राजगुरू यांनी लक्ष वेधून घेतलं आहे. या रिसेप्शन पार्टीला आकाश व रिंकू यांनीदेखील हजेरी लावली. त्यांचा एकत्र येतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आकाशने काळ्या रंगाची शेरवानी घातली होती. तर गुलाबी काठपदरच्या निळ्या साडीत रिंकू राजगुरू कमालीची सुंदर दिसत होती. दोघांच्या साधेपणाचंही सर्वत्र कौतुक होतं होतं.

आणखी वाचा – Video : …अन् सगळ्यांसमोर गुडघ्यावर बसून हार्दिक जोशीने बायकोला केलं प्रपोज, एकमेकांकडे प्रेमाने बघत राहिले आणि…; रोमँटिक व्हिडीओ व्हायरल

आमिर खानच्या लेकीच्या लग्नात रिंकू व आकाश यांनी एकत्र पोज देत फोटो काढले. दरम्यान या ग्रँड रिसेप्शन सोहळ्यातील रिंकूच्या महाराष्ट्रीयन लूककडे साऱ्यांच्या नजरा वळल्या. आयरा व नुपूर यांच्या दोन पद्धतीच्या लग्नानंतर शनिवारी मुंबईत भव्य रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला. या रिसेप्शन सोहळ्यात संपूर्ण बॉलीवूड अवतरलं होतं. या सोहळ्याचे फोटो व व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

Tags: aksha thosarentertainmentira khanira khan and nupur shikhare receptionnupur shikharerinku rajguru
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Prathamesh Parab Engagement

'या' दिवशी होणार प्रथमेश परबचा साखरपुडा, अभिनेत्याच्या होणाऱ्या बायकोने सांगितली तारीख, म्हणाली, " लग्नाची तारीख…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.