शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बच्चन कुटुंबियांमध्ये वाद सुरु असताना सून-लेकासह धमाल करताना दिसले अमिताभ, पण जया बच्चन यांनी येणं टाळलं, फोटो व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 8, 2024 | 11:57 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
aishwarya rai amitabh and aaradhya join abhishek to cheer for jaipur pink panthers video viral on social media

बच्चन कुटुंबियांमध्ये वाद सुरु असताना सून-लेकासह धमाल करताना दिसले अमिताभ, पण जया बच्चन यांनी येणं टाळलं, फोटो व्हायरल

बॉलिवूडमधील अत्यंत लोकप्रिय कुटुंब म्हणून बच्चन कुटुंबाचे नाव आग्रहाने घेतले जाते. बच्चन कुटुंब हे कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच बच्चन कुटुंबियामध्ये काही कारणांवरुन मतभेद असल्याच्या बातम्या आल्या होत्या. यावरुन ऐश्वर्या व पती अभिषेक बच्चन मुलगी आराध्यासह घरातून बाहेर पडले असल्याचे पाहायला मिळाले. अशातच ऐश्वर्या राय व तिचे सासरे अमिताभ बच्चन यांच्यासह पती अभिषेक बच्चनच्या टीमला पाठिंबा देत असल्याचे पाहायला मिळाले. (Bachchan Family Cheering)

शनिवारी (६ जानेवारी २०२४) रोजी मुंबईतील सरदार वल्लभभाई पटेल इनडोअर स्टेडियमवर कबड्डीचा सामना झाला. यावेळी ‘जयपूर पिंक पँथर्स’ या संघाला पाठिंबा दर्शवण्यासाठी अभिषेक बच्चन त्याच्या कुटुंबासह स्टेडियमवर पोहोचले होते. यावेळी अमिताभ, ऐश्वर्या व आराध्या हे स्टेडियमच्या प्रेक्षक गॅलरीत अभिषेकबरोबर बसून जयपूर पिंक पँथर्सचा जयजयकार करताना दिसले. सोशल मीडियावर या सामन्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या, अमिताभ, आराध्या व अभिषेक यांनी जयपूर पिंक पँथर्सचे टी-शर्ट घातले होते. या सामन्यादरम्यान संपूर्ण बच्चन कुटुंब सामना पाहण्यात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी सामन्याच्या संपूर्ण वातावरणात बच्चन कुटुंबियांच्या भावना बदलताना पाहायला मिळत होते.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आणखी वाचा – राममंदिर प्राणप्रतिष्ठापनासाठी रणबीर कपूर व आलिया भट्ट यांना खास आमंत्रण, अभिषेक सोहळ्यासाठी अयोध्येला जाणार

‘यु मुंबा’ विरुद्ध ‘जयपूर पिंक पंथर्स’ अशा या रोमहर्षक सामन्यात ‘जयपूर पिंक पँथर्स’चा विजय झाला आणि या विजयाचा आनंद बच्चन कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. त्यांचा हा खास व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. स्टार स्पोर्ट्सने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करत या व्हिडीओखाली “जयपूर पिंक पँथर्सचा विजय पाहण्यासाठी अमिताभ, ऐश्वर्या आणि अभिषेक हे सर्व उपस्थित होते.” असं कॅप्शन लिहिलं आहे.    

आणखी वाचा – Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम चेतना भटचा मालदीवमध्ये नवऱ्यासह रोमँटिक अंदाज, एकत्र डान्सही केला, व्हिडीओ तुफान व्हायरल

दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून यावर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत या व्हिडीओला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओखाली “यांना एकत्र बघून छान वाटले, यांच्यात जया बच्चन कुठे दिसत नाही आहे?, हे चित्र खूप आशावादी आहे” अशा अनेक सकारात्मक कमेंट्स केल्या आहेत.

Tags: Aaradhya bachachnabhishek bachchanAishwarya rai Aishwarya Rai bachchanAmitabh bachachnBollywood entertainmentbollywood newsentetrtainment newsJaipur pink pantherskambaddi match
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Next Post
Nupur Shikhare and Ira Khan Marriage

Video : आमिर खानने लेकीच्या लग्नासाठी बूक केलेलं उदयपूरमधील पॅलेस आहे इतकं भव्यदिव्य, वऱ्हाडी बोटीने पोहोचले अन्…; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.