बॉलिवूडमधील अत्यंत लोकप्रिय कुटुंब म्हणून बच्चन कुटुंबाचे नाव आग्रहाने घेतले जाते. बच्चन कुटुंब हे कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच बच्चन कुटुंबियामध्ये काही कारणांवरुन मतभेद असल्याच्या बातम्या आल्या होत्या. यावरुन ऐश्वर्या व पती अभिषेक बच्चन मुलगी आराध्यासह घरातून बाहेर पडले असल्याचे पाहायला मिळाले. अशातच ऐश्वर्या राय व तिचे सासरे अमिताभ बच्चन यांच्यासह पती अभिषेक बच्चनच्या टीमला पाठिंबा देत असल्याचे पाहायला मिळाले. (Bachchan Family Cheering)
शनिवारी (६ जानेवारी २०२४) रोजी मुंबईतील सरदार वल्लभभाई पटेल इनडोअर स्टेडियमवर कबड्डीचा सामना झाला. यावेळी ‘जयपूर पिंक पँथर्स’ या संघाला पाठिंबा दर्शवण्यासाठी अभिषेक बच्चन त्याच्या कुटुंबासह स्टेडियमवर पोहोचले होते. यावेळी अमिताभ, ऐश्वर्या व आराध्या हे स्टेडियमच्या प्रेक्षक गॅलरीत अभिषेकबरोबर बसून जयपूर पिंक पँथर्सचा जयजयकार करताना दिसले. सोशल मीडियावर या सामन्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या, अमिताभ, आराध्या व अभिषेक यांनी जयपूर पिंक पँथर्सचे टी-शर्ट घातले होते. या सामन्यादरम्यान संपूर्ण बच्चन कुटुंब सामना पाहण्यात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी सामन्याच्या संपूर्ण वातावरणात बच्चन कुटुंबियांच्या भावना बदलताना पाहायला मिळत होते.
आणखी वाचा – राममंदिर प्राणप्रतिष्ठापनासाठी रणबीर कपूर व आलिया भट्ट यांना खास आमंत्रण, अभिषेक सोहळ्यासाठी अयोध्येला जाणार
‘यु मुंबा’ विरुद्ध ‘जयपूर पिंक पंथर्स’ अशा या रोमहर्षक सामन्यात ‘जयपूर पिंक पँथर्स’चा विजय झाला आणि या विजयाचा आनंद बच्चन कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. त्यांचा हा खास व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. स्टार स्पोर्ट्सने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करत या व्हिडीओखाली “जयपूर पिंक पँथर्सचा विजय पाहण्यासाठी अमिताभ, ऐश्वर्या आणि अभिषेक हे सर्व उपस्थित होते.” असं कॅप्शन लिहिलं आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून यावर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत या व्हिडीओला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओखाली “यांना एकत्र बघून छान वाटले, यांच्यात जया बच्चन कुठे दिसत नाही आहे?, हे चित्र खूप आशावादी आहे” अशा अनेक सकारात्मक कमेंट्स केल्या आहेत.