‘कधी गोड, कधी तिखट’ अशी आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली विनोदी अभिनेत्री म्हणजे चेतना भट. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमामधून चेतनाचे चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. या कार्यक्रमातील तिचे अनेक स्किट्स हे तुफान व्हायरल होत असतात. चेतना आपल्या विनोदाच्या अनोख्या बाजाने प्रेक्षकांची आवडती झाली आहे. चेतनाचे गौरव मोरे व समीर चौघुले यांच्याबरोबरचे विनोदी स्किट्स, नम्रता संभेराव व वनिता खरात यांच्याबरोबरचे सासू सुनेचे स्किट्स तसेच लोचन मजनू यांसारखे अनेक विनोदी स्किट्स चांगलेच लोकप्रिय आहेत. (Chetana Bhat On Instagram)
चेतना भट ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. ती नेहमीच सोशल मीडियावर विविध पोस्ट व व्हिडीओ शेअर करत असते. अभिनेत्री तिच्या नवऱ्यासह मालदीवमध्ये गेले असून तिथली काही खास क्षण तिने इन्स्टाग्रामद्वारे चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. मालदिव्सच्या आठवणी असं म्हणत तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. गेले काही दिवस तिचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. अशातच अभिनेत्रीने नुकताच एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. चेतनाने पती मंदार चोळकेबरोबरचा एक धम्माल डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.
‘अॅनिमल’ या गाजलेल्या चित्रपटातील ‘जमाल कुडू’ या प्रचंड लोकप्रिय व ट्रेंडिंग गाण्यावर चेतना व मंदार यांनी भन्नाट डान्स केला आहे. चेतना-मंदार दोघेही या गाण्यावर चांगलाच ताल धरताना पाहायला मिळत आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या व्यस्त वेळापत्रकामधून वेळ काढत अभिनेत्री तिच्या नवऱ्याबरोबर काही खास क्षण एन्जॉय करताना दिसत आहे. या व्हिडीओवर शिवाली परबने हार्ट इमोजीस पोस्ट केल्या आहेत. तर गायिका वैशाली सामंतने “हे काय ऐकत नाहीत. येणार नाहीत परत बहुतेक. तिथेच थाटणार संसार” अशी मजेशीर कमेंट केली आहे. तसेच अनेक चाहते मंडळींनीदेखील लाईक्स व कमेंट्सद्वारे या व्हिडीओला चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
दरम्यान, चेतनाचा नवरा मंदार हादेखील मनोरंजन क्षेत्राशी निगडीत आहे. आजवर त्याने अनेक लोकप्रिय गाणी शब्दबद्ध केली आहेत. ‘दुनियादारी’, ‘क्लासमेट्स’, ‘मितवा’, ‘गुरु’ अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांसाठी त्याने गीतलेखन केले असून यातील गाणी खूपच लोकप्रिय झाली आहेत.