शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आमचे एकत्र फोटो…”, सिद्धार्थ बोडकेबरोबरच्या नात्यावर तितिक्षा तावडेचा खुलासा, म्हणाली, “गेली अनेक वर्ष…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 4, 2024 | 5:35 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
actress titeekshaa tawde talked about her relation with actor iddharth bodke

"आमचे एकत्र फोटो...”, सिद्धार्थ बोडकेबरोबरच्या नात्यावर तितिक्षा तावडेचा खुलासा, म्हणाली, “गेली अनेक वर्ष…”

सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात कलाकारांची वैयक्तिक आयुष्य अनेकदा चर्चेत येत असतात. सोशल मीडियावर कलाकारांकडून शेअर केल्या जाणाऱ्या फोटो व व्हिडीओमुळे अनेकदा त्यांचे आयुष्य नकळत त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहचत असते आणि चाहतेही आपल्या आवडत्या कलाकारांचं खासगी आयुष्य जाणून घेण्यात अधिक उत्सुक असतात. मात्र, काही कलाकार त्यांच्या नात्याबाबत उघडपणे बोलताना दिसतात. तर काही आपल्या खासगी आयुष्याबाबात न बोलणंच पसंत करतात. त्यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे तितिक्षा तावडे. (Titeekshaa Tawde On Her Relationship)

तितिक्षा सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकेतील तितिक्षाची नेत्रा ही भूमिका चाहत्यांच्या विशेष पसंतीस पडते. अभिनेत्री सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत ती कायम चर्चेत राहत असते. आपल्या अभिनयामुळे व स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत राहणारी ही अभिनेत्री अनेकदा अभिनेता सिद्धार्थ बोडकेबरोबरच्या अनेक फोटोमुळेही चर्चेत आली आहे. तितिक्षा सिद्धार्थबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना अनेकदा उधाण आलं असल्याचे पाहायला मिळाले आहे.

आणखी वाचा – Video : लेकीच्या लग्नात पाहुणेमंडळींसमोरच पूर्वाश्रमीच्या पत्नीसह बेभान होऊन नाचला आमिर खान, व्हिडीओची तुफान चर्चा

अशातच ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत तितिक्षाने तिच्या व सिद्धार्थबरोबरच्या नात्यावर खुलासा केला आहे. यावेळी तितिक्षाला “सोशल मीडियावर सिद्धार्थ व तितिक्षा एकमेकांना डेट करत असल्याच्या अनेक चर्चा रंगताना पाहायला मिळतात याबद्दल तुझं काय मत आहे?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ती उत्तर देत असं म्हणाली की, “आम्ही खूप जुने मित्र आहोत. आम्ही गेली अनेक वर्ष एकमेकांना ओळखत असून आम्ही दोघांनी आमच्या संघर्षाला एकत्र सुरुवात केली होती. २०१५ साली ‘असे हे कन्यादान’ मालिकेत मुख्य कलाकारांच्या मित्र-मैत्रिणींची भूमिका साकारत होतो. त्या मालिकेपासूनची आमची मैत्री आहे. आम्ही दोघांनी आमच्या संघर्षाचा प्रवास एकत्र पाहिला आहे. तसेच आम्ही हल्ली आमचे एकमेकांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असल्यामुळे लोकांना आम्ही रिलेशनमध्ये असल्याचे वाटत असावे”

आणखी वाचा – “खुशीच्या रुममधून रडण्याचा आवाज आला अन्…”, जान्हवी कपूरने सांगितला आईच्या मृत्यूनंतरचा ‘तो’ भयानक प्रसंग, म्हणाली, “तिला रडताना…”

दरम्यान, तितिक्षा व सिद्धार्थ यांचे एकमेकांबरोबरचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळाले आहेत. तसेच दोघांच्या फोटोवर त्यांच्या चाहत्यांनीदेखील अनेकदा ते दोघे रिलेशनमध्ये असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मात्र, अभिनेत्रीने आता याबद्दल स्वत: खुलासा केला असून सिद्धार्थ व तितिक्षा यांच्यामध्ये मैत्रीशिवाय कोणतेही नाते नसल्याचे मत तितिक्षाने व्यक्त केले.      

Tags: entertainment newsmarathi actormarathi actressmarathi entertainmentMarathi newssiddharth bodketiteeksha tawde
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Deepika Padukone and Ranveer Singh

दीपिका पदुकोण लवकरच होणार आई? पहिल्यांदाच केलं भाष्य, म्हणाली, "आमच्या मुलांना आम्ही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.