दीपिका पदुकोण व रणवीर सिंह हे बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. या जोडीने आजवर त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली. ऑनस्क्रीन ही जोडी जशी चर्चेत असते त्याहून कित्येक पटींनी जास्त ही जोडी ऑफस्क्रिन केमिस्ट्रीमुळे चर्चेत असते. दीपिका व रणवीर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने करिअरबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक खुलासे केले आहेत. (Deepika Padukone and Ranveer Singh)
‘वोग सिंगापूर’ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत दीपिकाने फॅमिली प्लॅनिंगचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा दीपिका व रणवीर चर्चेत आले आहेत. यावेळी बोलताना दीपिकाने तिला त्यांच्या मुलांचे संगोपन कसे करायचे आहे आणि त्यांच्यात चांगले संस्कार कसे रुजवायचे आहेत, याबद्दलही भाष्य केलं आहे. अलीकडेच दीपिका पदुकोणने रणवीर सिंगसह कुटुंब पुढे नेण्याबाबत भाष्य केलं आहे.
दीपिकाला जेव्हा पालक बनण्याबद्दल विचारले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हास्य होते. याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, “नक्कीच. रणवीर व मला लहान मुले आवडतात. आम्ही त्या दिवसाची वाट पाहत आहोत जेव्हा आम्ही आमचं स्वतःचं कुटुंब सुरू करू”. यापुढे ती म्हणाली, “ज्यांच्यासमोर मी लहानाची मोठी झाले असे माझे नातेवाईक, मित्रपरिवार यांना जेव्हा जेव्हा मी भेटते तेव्हा तेव्हा ते नेहमी म्हणतात की माझ्यात जरासुद्धा बदल झालेला नाही. हे माझ्यावरील संस्कारांमुळेच आहे. मला घरी कोणीही सेलिब्रिटीसारखे वागवत नाही. मी प्रथम एक मुलगी व बहीण आहे. माझे कुटुंबच माझे पाय जमिनीवर ठेवतात. रणवीर व मला आशा आहे की, आमच्या मुलांनाही आम्ही असेच संस्कार देऊ” असंही अभिनेत्री म्हणाली.
दीपिका पदुकोण व रणवीर सिंह यांनी अलीकडेच ‘कॉफी विथ करण ८’ या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या शोमधील सहभागामुळे ही जोडी चर्चेत आली होती. यादरम्यान बोलताना दीपिका व रणवीरने त्यांची प्रेमकथा, त्याने लग्नाचा प्रस्ताव कसा ठेवला आणि दीपिकाच्या नैराश्याच्या प्रसंगांमध्ये रणवीर कसा पाठीशी होता याबाबत बरंच भाष्य केलं.