कलाकार मंडळी एकामागोमाग एक आनंदाची बातमी शेअर करत आहेत. अशातच प्रेक्षकांचा लाडका आपला माणूस शिव ठाकरेनेही चाहत्यांसह एक गुडन्यूज शेअर केली आहे. सिनेसृष्टीत कुणीही वारसा नसताना केवळ टॅलेंटच्या जोरावर शिवने स्वतःच स्थान निर्माण केलं आहे. मराठी तसेच हिंदी सिनेजगतात शिव ठाकरेचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. शिवला आज विशेष लोकप्रियता मिळाला असली तरी आजही त्याचे पाय जमिनीवर आहेत. (Shiv Thakare Shared Goodnews)
‘बिग बॉस’ मराठी विजेतेपद पटकावल्यानंर खतरो के खिलाडी, रोडीज, ‘बिग बॉस १६’ यासारख्या हिंदी रिऍलिटी शोमधून त्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. प्रेक्षकांच्या या लाडक्या शिवने चाहत्यांसह एक आनंदाची बातमी शेअर केली. मूळचा अहमदनगरचा शिव आता मुंबईकर झाला आहे. शिव ठाकरेने मुंबईत त्याच हक्काचं घर घेतलं आहे. ही आनंदाची बातमी त्याने त्याच्या सध्या सुरु असलेल्या झलक दिखला जा या कार्यक्रमावेळी सांगितली.
या कार्यक्रमात जेव्हा गौहर खान व ऋत्विक धनजानी यांनी शिवला २०२३ हे वर्ष त्याच्यासाठी कसे होते असा प्रश्न विचारला. यावर तो म्हणाला, “हे वर्ष माझ्यासाठी खूप खास होते. या वर्षात माझे संपूर्ण आयुष्य बदलले आहे”. शिव पुढे म्हणाला, “मी सुरुवात हळू केली, पण या वर्षात खूप बदल झाले आहेत. मला वाटायचे की मी सेकंड हँड कार घेईन पण यावर्षी मी ३० लाख रुपयांची नवीन कार घेतली”.
यापुढे शिव म्हणाला, “लोक म्हणतात की मुंबईत घर घेण्यासाठी आयुष्यभर झगडावं लागतं. मी आनंदाने माझ्या झलक कुटुंबासह हे शेअर करतो की, मी नवीन घर घेतले आहे. फक्त ८ दिवसांपूर्वी मी नवीन घर बुक केले आहे” असं तो म्हणाला. नववर्षाच्या मुहूर्तावर शिव ठाकरेने नवीन आलिशान घर खरेदी केले असून लवकरच तो नव्या घरात राहायला जाणार आहे.