Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’ या कार्यक्रमातील कलाकारांनी सध्या शोमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आयशा खान आल्यापासून ‘बिग बॉस’च्या घरात वेगळाच गोंधळ सुरु असलेला पाहायला मिळत आहे. विकेंड का वारमध्ये सलमान खान मुनव्वरची शाळा घेणार असल्याचं सर्वांना वाटत आहे. मात्र याच्या उलट विकेंड का वारमध्ये घडताना दिसणार आहे. सलमान मुनव्वरची नाही तर आयशा खानची शाळा घेणार आहे. याचदरम्यान आयशाची प्रकृती बिघडते त्यामुळे तिला वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीद्वारे बाहेर नेण्यात येतं.
‘द खबरी’च्या वृत्तानुसार, ‘विकेंड का वार’ दरम्यान आयशा खान बेशुद्ध होते. त्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी तिला घराबाहेर काढण्यात येते. मुनव्वरला सपोर्ट करत सलमान आयशाची शाळा घेणार असल्याचं चित्र दिसत आहे. सलमान आयशाला या शोमध्ये येण्यामागच्या उद्देशाबद्दल प्रश्न विचारणार आहे. यावर बोलताना ती मुनव्वरची माफी मागण्याचा उल्लेख करणार आहे.
आयशा सांगते की, नकारात्मकता असह्य झाली होती, ज्यामुळे तिला शोमध्ये प्रवेश करावा लागला. मात्र आयशाचे म्हणणं सलमान मान्य करत नाही आणि म्हणतो की, जर हे खरे असते तर ती मुनव्वरला नंतर कुठेही भेटू शकली असती. आयशा शोमध्ये लक्ष वेधण्यासाठी व स्क्रीनवर दिसण्यासाठी आल्याचा आरोप सलमान करताना दिसणार आहे. सलमान मुनव्वरची बाजू सांभाळत त्याला आग्रह करतो की मुनव्वरने कोणालाही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही, कारण आयशा प्रेमाचेनिमित्त वापरून त्याचा अपमान करत आहे, आणि आता माफी मागत आहे.
अभिषेक कुमारचा पर्दाफाश करुन सलमान खान त्याच्या खेळाचा पर्दाफाश करणार आहे. अभिषेकचा हा खेळ मुनव्वर व मन्नारा चोप्रा यांच्या विरोधात करत आहे. सलमानने इशा मालवीय व चिंटू उर्फ समर्थ जुरेल यांना या विकेंड का वारमध्ये पाठिंबा दिलेला पाहायला मिळाला.