शाहरुख खान स्टारर ‘डंकी’मध्ये सहाय्यक भूमिकेत दिसलेल्या विक्रम कोचरने अभिनेत्याच्या ‘मन्नत’ बंगल्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या ऐकून सर्वचजण आश्चर्यचकित होतील. विक्रम कोचर यांनी एका मुलाखतीत सांगितले की, शाहरुखच्या ‘मन्नत’मध्ये अनेक रोबोट्स आहेत. त्याच्या घराच्या आत अनेक स्तरांवर सुरक्षा तपासणी केली जाते. राजकुमार हिरानीच्या ‘डंकी’ चित्रपटासाठी विक्रम कोचरला साइन केले होते तेव्हा शाहरुखने त्याला त्याच्या घरी जेवायला बोलावले होते. (Vikram Kochhar On Shahrukh Khan Mannat)
विक्रम कोचर जेव्हा ‘मन्नत’मध्ये पोहोचला तेव्हा त्या घरच्या आतील दृश्य पाहून त्याचे डोळे पाणावले. शाहरुखचा धाकटा मुलगा अबराम याने त्याच्यासाठी केक तयार करुन त्याला खाऊ घातल्याचेही त्याने सांगितले होते. विक्रम कोचर याने ‘होम बॉलीवूड’ला दिलेल्या मुलाखतीत शाहरुख खानच्या ‘मन्नत’ भेटीचा अनुभव शेअर केला. त्याने सांगितले की, जेव्हा तो शाहरुखच्या बंगल्यावर पोहोचला तेव्हा असे वाटले की तो पंचतारांकित हॉटेलमध्ये आहे. तेथे प्रत्येक कामासाठी कर्मचारी होते आणि आतील दृश्य अतिशय नयनरम्य होती.
विक्रम कोचर म्हणाले, ‘शाहरुख सरांनी माझे अतिशय प्रेमाने स्वागत केले. त्यांचा मुलगा अब्रामला मी भेटलो, तो त्या दिवशी केक बनवत होता. त्याने बनवलेला केकही मला खायला दिला. तो खूप गोड व हुशार मुलगा आहे. विक्रम कोचर याने सांगितले की, ते दोन वर्षांपूर्वी ‘मन्नत’चं मला आमंत्रण आलं होतं, आमंत्रण असूनही तेथे जावे की नाही याची खात्री नव्हती.
विक्रम कोचरने ‘मन्नत’चं वर्णन करत सांगितलं, ‘मन्नत’बद्दल मी जी कल्पना केली होती त्याहून कित्येक पटींनी ते अद्भुत आहे. ही एक अतिशय आरामदायक जागा आहे. शाहरुख सर त्यांच्या पाहुण्यांचे ज्याप्रकारे स्वागत करतात त्याचे शब्दांत वर्णन करता येणं अवघड आहे. त्यांनी माझे अत्यंत प्रेमाने स्वागत केले. शाहरुख सरांना रोबोट्स खूप आवडतात. त्यांना तंत्रज्ञानाची खूप आवड आहे. त्यामुळे त्याच्या चित्रपटांमध्ये भरपूर VFX असतं. त्यांच्या घरात रोबोट होते. रोबोबद्दल सांगताना ते खूप आनंदित झाले. त्यांच्या घरातील प्रत्येक गोष्ट अतिशय व्यवस्थितपणे मांडलेली होती.