Gautami Deshpande and Swanand Tendulkar Marriage : अमृता देशमुख-प्रसाद जवादे, सुरुची अडारकर-पियुष रानडे, मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटे या कलाकार जोड्या काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकल्या. या मागोमाग आता आणखी एक कलाकार जोडी विवाहबंधनात अडकली आहे. अभिनेत्री गौतमी देशपांडे व स्वानंद तेंडुलकर नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांचा शाही विवाहसोहळा नुकताच पार पडला आहे. अगदी शाही थाटामाटात गौतमी व स्वानंद यांचा लग्नसोहळा संपन्न झाला आहे.
गेले काही दिवस गौतमी व स्वानंदच्या मेहंदी, संगीत व हळदी सोहळ्याचे अनेक क्षण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. त्यांचे हे फोटो पाहून अनेकांना त्यांच्या लग्नाची आतुरता लागली होती आणि अखेर ही लोकप्रिय जोडी नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून अल्पावधीतच या फोटोंना अल्पावधीतच तुफान प्रतिसाद मिळाला आहे.
गौतमी-स्वानंद यांचा त्यांच्या लग्नातील खास पारंपरिक लूक लक्षवेधी ठरत होता. यानंतर आता गौतमीच्या लग्नातील रिसेप्शन लूकही समोर आला आहे. गौतमीने तिच्या रिसेप्शनसाठी मोरपिसी रंगाची साडी नेसली आहे. गौतमीचा अत्यंत साधा व पारंपरिक अंदाज या लूकमध्ये पाहायला मिळाला. तर स्वानंदने मरून रंगाचा ड्रेस परिधान केला होता. गौतमीच्या रिसेप्शनच्या सध्या लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिजीत खांडकेकरने गौतमीच्या रिसेप्शन लूकचा फोटो शेअर केला आहे. यांत अभिनेत्याची पत्नीदेखील पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – गौतमी देशपांडेच्या लग्नात मृण्मयीने पिळला स्वानंदचा कान, असा पार पडला लग्नसोहळा
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून गौतमी व स्वानंद यांच्या लग्नाचे अनेक विधी सोशल मीडियावर चाहत्यांना पाहायला मिळत होते. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना लग्नाची चांगलीच उत्सुकता लागली होती आणि अखेर ही जोडी विवाहबंधनात अडकली आहे. गौतमी व स्वानंदच्या हळदी, संगीतच्या व्हिडीओ व फोटोंनीही सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता.