मराठी सिनेसृष्टीसह आता बॉलिवूडमध्येही लगीनघाई पाहायला मिळत आहे. बॉलिवूड अभिनेता अरबाज खान व शूरा खान यांचा विवाहसोहळा संपन्न झाला आहे. अर्पिता खानच्या घरी २४ डिसेंबरला या दोघांचे लग्न झाले. अरबाजच्या विवाह सोहळ्याला अनेक बॉलिवूड कलाकारांनीही हजेरी लावली होती. अरबाजच्या लग्नसोहळ्यातील आतापर्यंत अनेक फोटो व व्हिडीओ समोर आले आहेत. (Salman Khan Dance)
अरबाज खानने वयाच्या ५६ व्या वर्षी दुसरे लग्न केले आहे. मेकअप आर्टिस्ट शूरा खानसह त्याने लग्न केले आहे. अरबाजने त्याच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. अरबाजच्या लग्नाला रवीना टंडन, रितेश देशमुख यांच्यासह अनेक बी-टाऊन कलाकारांनी हजेरी लावली होती. भावाच्या लग्नात सलमान खानने स्टेप्स डान्स केलेला एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान शूरासह डान्स करताना दिसत आहे. सलमानने ‘दिल दिया गल्ला’ आणि ‘तेरे मस्त, मस्त दो नैन’ या गाण्यांवर शूरा, अरहान आणि इतरांसह डान्स केला आहे. भाभिजानसह सलमानच्या डान्सने टाळ्या मिळवल्या.
याशिवाय अरबाजच्या लेकाचाही वडिलांच्या लग्नातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अरहानने वडिलांच्या लग्नात गिटार वाजवल्याचे पाहायला मिळाले. अरहान गिटार वाजवत असताना त्याचे वडील अरबाज अरहानला कॅमेऱ्यात कैद करतानाही दिसला. अरबाजने स्वत:च्या मोबाईलमध्ये आपल्या लेकाचा खास व्हिडीओ काढला आहे. तसेच अरहानने या लग्नात डान्सही केला. अरहानचा हा गिटार वाजवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अरबाज खानने १९९८मध्ये मलायका अरोरासह लग्न केले. त्यानंतर जवळपास १९ वर्षांनी ते दोघे वेगळे झाले. मलायकापासून वेगळे झाल्यानंतर अरबाजचे जॉर्जिया एंड्रियानीबरोबर बरेच दिवस संबंध होते. जॉर्जियानंतर अरबाजने शूराला डेट केले. एका चित्रपटाच्या सेटवर दोघांची मैत्री झाली आणि येथूनच त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली.