रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate : आमचं झालंय! मुग्धा-प्रथमेशची लग्नानंतरची पहिली पोस्ट चर्चेत, पारंपरिक लूक ठरतोय लक्षवेधी

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 23, 2023 | 10:47 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate wedding

आमचं झालंय! मुग्धा-प्रथमेशची लग्नानंतरची पहिली पोस्ट चर्चेत, पारंपरिक लूक ठरतोय लक्षवेधी

Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate Haldi and Wedding : झी मराठीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प’चे पहिले रत्न गाजवणारे गायक प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन यांनी काही दिवसांपूर्वी ‘आमचं ठरलंय’ असं म्हणत लग्न करणार असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. तेव्हापासून ही जोडी केव्हा लग्नबंधनात अडकणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. अखेर २१ डिसेंबर रोजी मुग्धा व प्रथमेश बोहोल्यावर चढले आहेत. मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाच्या फोटो, व्हिडीओने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

अत्यंत साधेपणाने मुग्धा व प्रथमेश यांचा विवाहसोहळा पार पडला असल्याचं दिसतंय. चिपळूण येथे दोघांनी डेस्टिनेशन वेडिंगचा घाट घातला होता. त्यांचा विवाहसोहळा कुटुंबीय, नातेवाईक व मित्रमंडळींच्या उपस्थितीत अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला. लग्नादिवशी दोघेही खूप खुश दिसत होते. कलाक्षेत्रातील बऱ्याच कलाकार मंडळींनी मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाला हजेरी लावली होती. चाहत्यांनाही त्यांची ही लाडकी जोडी अखेर विवाहबंधनात अडकल्याने आनंद झाला आहे.

आणखी वाचा – फुलांची रांगोळी, स्पेशल बेत अन्… ; बहिणीच्या केळवणासाठी मृण्मयी देशपांडेची जय्यत तयारी, कुटुंबीयांचाही खास थाटमाट

‘आमचं ठरलंय ते आमचं झालंय’, इथवरचा दोघांचा संपूर्ण प्रवास पूर्ण झाला आहे. अखेर लग्नानंतर मुग्धा व प्रथमेश यांनी सोशल मीडियावरुन त्यांच्या लग्नातील फोटोची पहिली पोस्ट शेअर केली आहे. पारंपरिक अंदाजात लग्नातील शेअर केलेलं फोटो साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. त्यांच्या या पोस्टवर सिनेक्षेत्रातील कलाकार मंडळींनी तसेच त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षांव केला आहे. तसेच अनेकांनी त्यांची ही पोस्ट रिपोस्ट करत त्यांना शुभाशीर्वाद दिले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Mugdha Bhagawan Vaishampayan (@mugdhabhagawan5)

आणखी वाचा – ‘काय वाटतंय?’ म्हणत मृण्मयी देशपांडेने शेअर केलेल्या बहिणीबरोबरच्या फोटोने लग्नाच्या चर्चांना उधाण, नेटकरी म्हणाले, “गौतमी ताईचं…”

मुग्धा व प्रथमेशने लग्नाआधीच्या विधींचे फोटोही शेअर केले होते. ग्रहमख, हळदीचे पारंपरिक फोटो त्यांनी शेअर केले होते. दोघांनी घरच्या घरीच हळदी समारंभ सोहळा उरकला. लग्नातील त्यांचा पुण्यवचन व रिसेप्शनचा लूकही साऱ्यांना विशेष भावला. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टवर अनेकजण त्यांच्या लूकचंही कौतुक करत आहेत.

Tags: entertainmentmugdha vaishampayanmugdha vaishampayan and prathamesh laghateMugdha Vaishampayan and Prathamesh Laghate Weddingprathamesh laghate
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
marathi seial rang majha vegla fame actress manasi ghate grahmakh photos shared on instagram

'रंग माझा वेगळा' फेम 'या' अभिनेत्रीचा सौभाग्यकांक्षिणीचा प्रवास सुरु, ग्रहमखचे फोटो शेअर करत म्हणाली, "विवाह मंडपाकडे…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.