सोशल मीडियावर अभिनेत्री मृण्मयी देशपांडे नेहमीच सक्रिय असते. काही ना काही शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. मृण्मयी तिच्या वैयक्तिक पोस्टमुळेही नेहमीच चर्चेत असते. तीच बहीण गौतमी देशपांडे बरोबरचे अनेक व्हिडीओ ती नेहमीच चाहत्यांसह शेअर करत असते. मृण्मयी व गौतमी दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्या सोशल मीडियावर एकमेकींबरोबरचे अनेक गंमतीशीर व्हिडीओ शेअर करत असतात. (Mrunmayee Deshpande and Gautami Deshpande)
अशातच अभिनेत्री गौतमी देशपांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. माझा होशील ना या मालिकेमुळे गौतमी घराघरांत पोहोचली. मालिका संपल्यानंतरही अभिनेत्रीची लोकप्रियता काही कमी झाली नाही. मनोरंजन विश्वाबरोबरच गौतमी सोशल मीडियावरही सक्रिय असते. तिची मोठी बहिण मृण्मयी हिच्याबरोबर धम्माल मस्तीचे व्हिडिओ, पोस्ट देखील ती शेअर करताना दिसते. त्यांच्या पोस्टवर चाहते देखील भरभरून कमेंट करत असतात. पण सध्या गौतमी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.
गौतमीच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं आहे. गौतमीच्या लग्नाची लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. मृण्मयीने बहिणीच्या लग्नाची जय्यत तयारी सुरु असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर केला होता. मृण्मयीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती संगीत सोहळ्याची तयारी करत असल्याचं कळालं. गौतमी देशपांडे व स्वानंद तेंडुलकर लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा आहेत. मध्यंतरी गौतमीने स्वानंदबरोबरचा शेअर केलेला फोटो पाहून नेटकऱ्यांनी त्यांच्या रिलेशनशिपवर प्रश्न उपस्थित केले होते.
यानंतर आता मृण्मयीने पोस्ट केलेल्या एका फोटोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मृण्मयीने गौतमीबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये दोघीही एकमेकांकडे हसत पोज देत आहेत. या फोटोला मृण्मयीने काय वाटतंय? असं कॅप्शन दिलं आहे. कॅप्शन व फोटो पाहून दोघींच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करायला सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने, लग्न जमलं गौतमीचं” अशी कमेंट केली आहे. तर आणखी एकाने, “गौतमी ताईचं लग्न” अशी कमेंट केली आहे. नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर गौतमीच्या लग्नाच्या कमेंटचा सपाटा लावलेला पाहायला मिळत आहे.