शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शाहरुख खानच्या ‘डंकी’ व प्रभासच्या ‘सालार’चं ऑनलाइन लिकमुळे मोठं नुकसान, निर्मात्यांना बसणार मोठा फटका

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 22, 2023 | 7:30 pm
in Entertainment
Reading Time: 4 mins read
google-news
shah rukh khan starrer dunki and prabhas salaar movie leaked on online websites

शाहरुख खानच्या 'डंकी' व प्रभासच्या 'सालार'चं ऑनलाइन लिकमुळे मोठं नुकसान, निर्मात्यांना बसणार मोठा फटका

सध्या मनोरंजनविश्वात ‘डंकी’ व ‘सालार’ या चित्रपटांची जोरदार चर्चा सुरू आहे. काल (२१ डिसेंबर) रोजी ‘डंकी’ व आज ‘सालार’ हे दोन्ही चित्रपट मोठ्या पड्यावर प्रदर्शित झाले. प्रभासची मुख्य भूमिका असलेला ‘सालार’ व शाहरुख खानचा ‘डंकी’ या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटांनी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती. ‘डंकी’ने प्रदर्शनाच्या पहील्याच दिवशी जवळपास ३० कोटींची कमाई केली आहे. तर प्रदर्शनाच्या आधीच्या तिकीट बुकिंगमध्ये ‘सालार’ने ‘डंकी’ला मागे टाकले आहे. त्यामुळे ‘सालार’ व ‘डंकी’मध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. अशातच या दोन्ही चित्रपटांच्या निर्मात्यांना चिंतेत पाडणारी एक बातमी समोर आली आहे. (Dunki And Salaar Movie Leaked)

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच ऑनलाइन साइट्सवर लीक होणे हा जणू आता ट्रेंडचं झाला आहे. अशातच आता ‘डंकी’ व ‘सालार’ हे दोन्ही चित्रपट पायरसीचे बळी ठरले आहेत. काही रिपोर्ट्सनुसार, ‘सालार’ व ‘डंकी’चे एचडी व्हर्जन असलेले चित्रपट अनेक ऑनलाइन वेबसाइट्सवर लीक झाले आहेत. आतापर्यंत ३ ते ४ साइट्सवर हा चित्रपट लीक झाला आहे. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांना याचा चांगलाच फटका बसला आहे.

View this post on Instagram

A post shared by Prabhas (@actorprabhas)

आणखी वाचा – अवाढव्य खर्च करणं टाळलं, साधेपणात लग्न केल्यानंतर मुग्धा व प्रथमेशवर कौतुकाचा वर्षाव, चिपळूणमध्येच जमले नातेवाईक व मित्र परिवार अन्…

शाहरुख खानचे ‘जवान’ व ‘पठाण’ हे दोन्ही चित्रपट हिट झाल्यानंतर ‘डंकी’कडून शाहरुख खान व त्याच्या चाहत्यांना चांगलीच अपेक्षा आहे. तर प्रभासचे गेले काही चित्रपट अयशस्वी ठरल्यामुळे त्यालाही ‘सालार’कडून खूप अपेक्षा आहेत. पण चित्रपट ऑनलाइन लीक झाल्यामुळे या दोन्ही चित्रपटांना चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे आता हे चित्रपट ऑनलाईन लीक करणाऱ्यांवर काही कारवाई होणार का? ऑनलाइन लीक झाल्यामुळे चित्रपटाच्या कलेक्शनवर याचा काही परिणाम होणार का? त्याचबरोबर चित्रपटाच्या निर्मात्यांना याचा कितपत फटका बसणार? याची सर्वांनाच चिंता लागली आहे.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

आणखी वाचा – प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसवरील वास्तुशांतीसाठी आजी-आजोबांची खास हजेरी, अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली, “अनेक अडचणी असूनही…”

दरम्यान, प्रशांत नील दिग्दर्शित ‘सालार ‘ या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच आगाऊ बुकिंगमध्ये चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच ४० कोटींचा व्यवसाय केला असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, आता ऑनलाईन लीकचा चित्रपटाच्या कमाईवर काही परिणाम होतो की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags: bollywood actorbollywood moviebollywood newsdunkientertainment newssalaar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Hardeek Joshi On Jau Bai Gavaat

“हॉस्पिटलमध्ये तिने माझा हात हातात घेतला अन्…”, वहिनीच्या निधनानंतर हार्दिक जोशीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाला, “खूप आजारी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.