रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसवरील वास्तुशांतीसाठी आजी-आजोबांची खास हजेरी, अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली, “अनेक अडचणी असूनही…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 23, 2023 | 9:58 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
marathi actress prajkta mali shared photos with her family at her new farmhouse

प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसवरील वास्तुशांतीसाठी आजी-आजोबांची खास हजेरी, अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली, "अनेक अडचणी असूनही…"

‘जुळून येती रेशीमगाठी’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ताने तिच्या सहजसुंदर अभिनेयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. अनेक मालिका व चित्रपटांमधून तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अभिनेत्री असण्याबरोबरच ती एक उद्योजिकादेखील आहे. ‘प्राजक्तराज’ नावाचा तिचा स्वत:चा दागिन्यांचा ब्रॅंड आहे. अशातच नुकताच प्राजक्ताने एक फार्महाऊसदेखील घेतला आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या या फार्महाउसचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. (Prajakta Mali On Instagram)

नुकताच प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे काही फोटो शेअर केले आहेत. प्राजक्ताने घेतलेल्या नवीन फार्महाऊसची वास्तुशांती होती. त्यानिमित्ताने प्राजक्ताचे आजी व आजोबा इथे मुंबईत आले आहेत. यावेळी त्यांच्याबरोबर प्राजक्ताने काही खास क्षण घालवले व या खास क्षणांना तिने आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. तसेच या फोटोखाली तिने “आजी-आजोबा (आईचे आई वडील) वास्तूशांतीसाठी खास पंढरपूरातून आले.” असं म्हटले आहे.

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

आणखी वाचा – अवाढव्य खर्च करणं टाळलं, साधेपणात लग्न केल्यानंतर मुग्धा व प्रथमेशवर कौतुकाचा वर्षाव, चिपळूणमध्येच जमले नातेवाईक व मित्र परिवार अन्…

त्याचबरोबर या फोटोत प्राजक्ताचे आई-वडील, भाऊ-वहिनी, आजी-आजोबा व त्यांच्या भाच्या अशा चार पिढ्या दिसत आहेत. त्यामुळे “प्राजक्तकुंज वर ४ पिढ्या” असंही म्हटलं आहे. त्याचबरोबर प्रेमाचे बंध असलेले मजबूत रक्ताचे नाते हा एक आशीर्वाद आहे आणि अनेक अडचणी असूनही आजी-आजोबा कुंज (फार्महाऊस)ला भेट देऊ शकले. याचा मला आनंद आहे” असं म्हणत तिने तिच्या कुटुंबियांबरोबरचे खास फोटो शेअर केले आहेत.  प्राजक्ताने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिच्या फर्महाऊसची वास्तुशांती होतानाचे खास क्षण प्राजक्ताने चाहत्यांबरोबर  शेअर केले आहेत.   

आणखी वाचा – रुपालीकडून अद्वैतनंतर आता नेत्रा-इंद्राणीच्या जीवाला धोका, मालिकेला नवं वळण, प्रेक्षकही चक्रावले

दरम्यान, प्राजक्ताने शेअर केलेल्या या फोटोखाली तिच्या अनेक चाहत्यांनी तिला या नवीन फार्महाऊससाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर या नवीन फार्महाऊससाठी तिचे कौतुकही केले आहे. “खुप छान, खूपच मोठं घर आहे, सुंदर फॅमिली” अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी प्राजक्ताच्या पोस्टला उत्तम प्रतिसाद दिला आहे.

Tags: entertainment newsmarathi actressmarathi entertainmentMarathi newsprajakta mali farmhouseprajkta mali
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Mrunmayee Deshpande and Gautami Deshpande

'काय वाटतंय?' म्हणत मृण्मयी देशपांडेने शेअर केलेल्या बहिणीबरोबरच्या फोटोने लग्नाच्या चर्चांना उधाण, नेटकरी म्हणाले, "गौतमी ताईचं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.