छोट्या पडद्यावरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांची आवडती मालिका होत चालली आहे. मालिकेचे रहस्यमय कथानकच या मालिकेचे मुख्य आकर्षण आहे. या मालिकेत एकामागून एक येणारे ट्विस्ट या मालिकेची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण होत आहेत. अशातच आता मालिकेत आणखी एक वळण आल्याचे पाहायला मिळत आहे. नुकताच मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला असून यामुळे चाहत्यांची अपेक्षा वाढली आहे. या नवीन प्रोमोमध्ये रुपालीकडून नेत्रा व इंद्राणी यांच्या जीवाला धोका असल्याचे कळत आहे. (Satvya Mulichi Satavi Mulgi New Promo)
नुकताच या मालिकेत रुपाली अद्वैतचं जीव घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळाले. या ट्विस्टमुळे चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अशातच आता आणखी एक झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे मालिकेचा एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमुळे मालिकेत येणाऱ्या नवीन ट्विस्टची झलक पाहायला मिळत आहे. या प्रोमोमध्ये, नेत्रा रूपालीला तुम्ही हे असं का केलंत असं विचारते. यावर रुपाली असं म्हणते की, “मला हे करांव लागलं. अद्वैत मला सर्पलिपी देत नव्हता, म्हणून मला त्याला मारावं लागलं.”
यापुढे रुपाली नेत्रा व इंद्राणीकडे संशयाने बघत असे म्हणते की, “परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येत आहे का? तुम्ही दोघीसुद्धा मला सर्पलिपी देत नाही आहात. मी मला हव्या असलेल्या गोष्टीसाठी साम, दाम, दंड, भेद सगळं वापरते.” तसेच यापुढे ती “मृत्यूचं तांडव सुरु झालं आहे” असं म्हणत त्या दोघांना धमकीवजा इशाराही देते. रुपालीच्या अशा वागण्यामुळे नेत्रा, इंद्राणीसह साऱ्यांनाच धक्का बसला आहे.
दरम्यान, नुकत्याच एका प्रोमोमध्ये रूपालीने सर्पलिपीसाठी अद्वैतचा जीव घेतला असल्याचे पहायला मिळाले आहे. त्याचबरोबर अद्वैतला रुपालीचे सत्यदेखील माहीत झाले आहे. आणि आता ती नेत्रा व इंद्राणी यांनाही धमकी देते. त्यामुळे आगामी भागांत नेत्रा-इंद्राणी यांच्या जीवाला नेमका काय धोका आहे? रुपाली त्या दोघींचा जीव घेणार का? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.