‘बिग बॉस १७’ हा लोकप्रिय शो सध्या विशेष चर्चेत आला आहे. या शोमध्ये होणाऱ्या भांडणांमुळे हा शो पाहणं रंजक ठरतंय. ‘बिग बॉस’चा हा शो पाहून अनेकांनी या कार्यक्रमाला पसंती दर्शविली आहे तर काहींनी टीका करायला सुरुवात केली आहे. तर अनेकांनी या शोवर नाराजी व्यक्त केलेली पाहायला मिळत आहे. दरम्यान ‘बिग बॉस’मध्ये खेळला जाणारा खेळ पक्षपाती असल्याचं मराठी ‘बिग बॉस’ फेम एका मराठमोळ्या अभिनेत्रीने केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे. ही मराठमोळी अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले. रुपाली भोसले ही आई कुठे काय करते मालिकेमुळे चर्चेत आली. याआधी ती ‘बिग बॉस’ मराठीच्या घरात झळकली होती. मराठी ‘बिग बॉस’ मुळेही तिला विशेष लोकप्रियता मिळाली. दरम्यान हिंदी ‘बिग बॉस’ वरुन अभिनेत्रीने केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे. (Rupali Bhosale On Ankita Lokhande)
रुपालीने इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट करत ‘बिग बॉस १७’ व ‘बिग बॉस १७’ मधील स्पर्धकांवर टीका केलेली पाहायला मिळत आहे. रुपालीने पोस्ट शेअर करत, “‘बिग बॉस’ आम्ही टास्क खेळून महागड्या वस्तू मिळवायचो. मात्र यांना काही न करता सेव्हन स्टार हॉटेलची ट्रीटमेंट मिळत आहे. केसांची ट्रीटमेंट करायला बाहेरून लोक येतात. कमाल आहे. मन्नारा व अंकिता यांच्या भांडणानंतर विकेंड का वारमध्ये मन्नाराला हे सांगण्यात येत की, तिला मोठ्यांचा आदर करता येत नाही. ईशा कोणाचा आदर करते. ती सगळ्यांबरोबर आदर न ठेवता बोलते. मात्र तिला कोणी काहीच बोलत नाही. का? हा ती १९ वर्षांची आहे म्हणून असावं” असं म्हटलं.
दुसऱ्या पोस्टमध्ये, “तर एकीकडे मन्नारा अंकिताचा आदर न करता बोलली, तिच्याशी भांडली तेव्हा तिला बरंच काही बोललं गेलं. अंकिता रिंकू मॅमबरोबर जसं बोलते ते आदराने असतं का? इथे वरिष्ठ वगैरे असं काही येत नाही का? ‘बिग बॉस’च्या घरात अंकितासाठी वेगळे नियम आहेत. ‘बिग बॉस’ पक्षपातीपणा करू लागलं आहे. ते त्यांच्या आवडीचे लोक निवडतात. तुम्हीआधी होता तसे नाही आहात” तिने असं म्हटलं आहे.

अंकिता लोखंडेबद्दल तिने पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “अंकिता पहिल्या दिवशी बोलली होती की, ‘मी खूप स्ट्रॉंग आहे, मी खूप मेहनती आहे. मी एकटी हा खेळ खेळणार आहे’. प्रत्येक आठवड्यात नॉमिनेशनच्या आधी वा नंतर तू सुशांत सिंह राजपूतचं नाव का घेते? सुशांत सिंगच्या फॅनकडून तुला वोट हवे आहेत म्हणून तू असं करतेस का? भूतकाळातील गोष्टी न आणता तू तुझा खेळ खेळून दाखव” असं तिने म्हटलं आहे.