शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

येत्या नवीन वर्षात ओटीटीवर मनोरंजनाची पर्वणी, ‘मिर्झापूर’, ‘पंचायत’सारख्या बहूचर्चित सिरीजचे नवीन सीझन येणार

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 19, 2023 | 4:28 pm
in Entertainment
Reading Time: 4 mins read
google-news
netflix amazon prime hotstar upcoming ott movies and series in new year see the details

येत्या नवीन वर्षात ओटीटीवर मनोरंजनाची पर्वणी, 'मिर्झापूर', 'पंचायत'सारख्या बहूचर्चित सिरीजचे नवीन सीझन येणार

२०२३ हे वर्ष संपून आता २०२४ हे नवीन वर्ष येणार आहे आणि येणारे हे नवीन वर्ष मनोरंजनाचा खजिना घेऊन येणार आहे. येणारे नवीन वर्ष हे अनेक गाजलेल्या कलाकृतींचे नवीन सीझन घेऊन येणार आहे. त्यामुळे ओटीटी वापरकर्ते आगामी नवीन वर्षाची वाट पाहत आहेत. ‘मिर्झापूर’, ‘पंचायत’, ‘आश्रम’ या गाजलेल्या वेबसिरीजचे नवीन सीझन येत्या वर्षात प्रदर्शित होणार आहेत आणि यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. तसेच क्रूरता व रक्तपाताने भरलेल्या क्राईम थ्रिलर वेबसिरीजही चाहत्यांच्या भेटीला येणार असल्यामुळे येत्या नवीन वर्षात ओटीटी वापरकर्त्यांसाठी ओटीटी पर्वणी असणार आहे.  (Upcoming OTT Series And Movies)

नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिलेल्या वेबसिरीजपैकी एक असलेल्या ‘राणा नायडू’चा पुढील सीझन येत्या वर्षात प्रदर्शित होणार आहे. या अ‍ॅक्शन, क्राईम व ड्रामा आसलेल्या सिरीजमध्ये सुरवीन चावला, राणा दग्गुबती व व्यंकटेश यांच्या भूमिका आहेत. ‘राणा नायडू’चा पहिल्या सीझनमध्ये अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले होते. त्यामुळे आता येत्या दुसऱ्या भागांत प्रेक्षकांना काय पहायला मिळणार यासाठी चाहते उत्सुक आहेत. दरम्यान ही सिरीज जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.      

View this post on Instagram

A post shared by Netflix India (@netflix_in)

क्राइम थ्रिलर असलेले ‘ग्यारह-ग्यारह’ या चित्रपटाची कथा एका खुनाच्या केसपासून सुरू होते. काही महिन्यांपूर्वी याचा ट्रेलर आला होता. तेव्हापासूनच या चित्रपटाविषयी उत्सुकता लागून राहिली होती. हा चित्रपट जानेवारी २०२४ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे, मात्र त्याची अद्याप तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म झी-५ वर प्रदर्शित होईल. यात राघव जुयाल व कृतिका कामरा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.   

नीरज पांडेच्या ‘खाकी’ वेबसिरीजचा पहिला सीझन खूपच धमाकेदार होता. प्रेक्षकांनी याला खूपच चांगला प्रतिसाद दिला होता. त्यामुळे आता दुस-या सिझनची आतुरता लागली आहे. दुसऱ्या सीझनमधील प्रकारणांची पोलीस कोणत्या पद्धतीने उकल करणार हे पाहण्यासारखे असेल. ‘खाकी २’ ची प्रदर्शनाची तारीख अद्याप निश्चित झालेली नसली तरी नेटफ्लिक्सवर ही सिरीज प्रदर्शित होणार आहे.  

View this post on Instagram

A post shared by Neeraj Pandey (@neerajpofficial)

आणखी वाचा – स्वानंदी टिकेकरची लग्नाची जोरदार तयारी, होणाऱ्या नवऱ्याने खास फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद, म्हणाला, “सहा दिवस…”

‘She’ च्या आत्तापर्यंतच्या कथेत पोलिस हवालदार भूमिका ही पोलिसांची नोकरी सोडून गुन्हेगार बनली आहे. ड्रग्ज माफियाला पकडण्यासाठी भूमिकाला एका वेगळ्या भूमिकेत आणले होते पण ती धैर्याने स्वतःचा शोध घेऊ लागते आणि मग असे काही घडते की ती स्वतः गुन्हेगार बनते. त्यामुळे आता आगामी भागात काय पाहायला मिळणार हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे. आगामी वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात हा नवीन भाग प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.  

आणखी वाचा – Video : भावाच्या लग्नामध्ये बहिणीसह हॉलच्या गेटवरच नाचली ऋतुजा बागवे, सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं अन्…; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

ओटीटीवर प्रचंड गाजलेल्या ‘मिर्झापूर’ या वेबसिरीज तरुणांमध्ये खुपच क्रेझ पाहायला मिळाली होती. ‘मिर्झापूर’चा दूसरा भागही बराच गाजला. अशातच ‘मिर्झापूर-३’च्या तिसऱ्या सीझनची घोषणा झाल्यामुळे चाहते खूपच उत्सुक आहेत. ही सिरीज नोव्हेंबर २०२४ मध्ये अ‍ॅमेझोन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होऊ शकते.  

Tags: bollywood movieentertainmententertainment newsmirzapurnew movieott
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Sayali Sanjeev And Rishi Saxena

'काहे दिया परदेस' फेम सायली संजीव व ऋषी सक्सेनाची जोडी सात वर्षांनी पुन्हा एकत्र, अभिनेत्री एकत्र फोटो शेअर करत म्हणाली…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.